गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

प्रदूषण कमी करण्यासाठी कोहलीचे दिल्लीकरांना आवाहन

नवी दिल्ली- दिल्लीतील धुराने प्रदूषणाचे विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या 17 वर्षांमध्ये प्रथमच दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली शहराला गॅस चेंबर म्हटले आहे. तर अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण यंत्रणेने भारतीय राजधानीला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हटले आहे. धुराचे प्रमाण अतिशय जास्त असल्याने दिल्लीतील दोन रणजी सामनेदेखील रद्द करण्यात आले आहेत.
 
दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती सुधारताना दिसत नाही आहे. दिल्लीच्या रहिवासी असलेला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्लीच्या प्रदूषणाविषयी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. दिल्लीतील प्रदूषणाची चिंता वाटते. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोकांनी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे, असे आवाहन विराट कोहलीने केले आहे.