मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (09:38 IST)

विराटच्या वन डे सामन्यातल्या १० हजार धावा पूर्ण

virat kohali
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत २०५ एकदिवसीत इनिंगमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचे सर्वात जलद १० धावा करण्याचे रेकॉर्ड मोडले. सचिनने २५९ एकदिवसीय इनिंगमध्ये १० हजार धावा केल्या होत्या. 
 
वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नुरसेच्या गोलंदाजीवर  ८१ वी धाव घेत विराटने एकदिवसीय सामन्यातील आपल्या १० हजार धावा पूर्ण केल्या. एकदिवसीय सामन्यात विराटच्या नावावर सर्वात जलद ८ हजार आणि ९ हजार धावा करण्याचाही विक्रम आहे. 
 
सचिनचे हे रेकॉर्ड मोडण्याच्या आधीच त्याने सचिनचे अजून एक रेकॉर्ड मोडले. मायदेशात एकदिवसीय सामन्यात सर्वात जदल ४ हजार धावा पूर्ण करण्याचे सचिनचे रेकॉर्ड विराटने मोडले आहे. विराट एकदिवसीय सामन्यात १० धावा पूर्ण करणारा ५ वा खेळाडू ठरला.