आशियातील सर्वात मोठा वाघ बेपत्ता

नागपूरच्या उमरेड अभयारण्याची ओळख बनलेला जय हा तरणाबांड वाघ 18 एपिल्रपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी 100 हून अधिक स्वयंसेवकांनी मोहीम राबवली आहे. आशियातील सर्वात मोठा वाघ अशी जयची ओळख आहे.

तब्बल 250 किलो वजन असलेला हा तरणाबांड वाघ या अभयारण्याची ओळख बनला होता. कित्येकदा पर्यटक या वाघाची एक झलक पाहण्यासाठी उमरेडला भेट द्यायचे. मात्र अचानक हा वाघ गायब झाल्याने वन्यप्रेमींच्या काळजीत भर पडली आहे.

जोडीदाराच्या शोधात तीन वर्षापूर्वी जय नद्या, शेत, इतकंच नाही तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा 100 किमी प्रवास करुन उमरेड अभयारण्यात आला होता. यानंतर तो सगळ्यांचा आवडता वाघ बनला. मात्र सहा वर्षाचा हा वाघ 18 एपिल्रपासून बेपत्ता आहे.

त्याचा शोध घेण्यासाठी वन्यप्रेमी, ङ्खोटोग्राङ्खर्स, स्वयंसेवक तसंच गाईड यांनी जयच्या शोधासाठी मोहीम राबवली आहे. हे स्वयंसेवक शेजारच्या 350 गावांमध्ये जयचा शोध घेणार आहेत. वर्धा, चंद्रपूर तसंच ज्या ठिकाणाहून जय आला त्या नागझिरा नवेगाव टायगर रिझर्व्ह हे स्वयंसेवक पिंजून काढणार आहेत.

अभयारण्यात वाघांची गणना करण्यासाठी गळ्यात रेडिओ कॉलर बसवण्यात येतं. मात्र ते यंत्रही बंद पडल्यामुळे जयला शोधण्यात सध्या अडचणी येत आहेत. जय मागील वर्षीही दोन महिन्यांसाठी गायब झाला होता, अशी माहिती वनअधिकारी रोहित कारु यांनी दिली.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकच्या गळती दुर्घटनेचे ...

झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकच्या गळती दुर्घटनेचे कारण...; 22 मृतांची नावे
नाशिक मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या गळतीमुळे ऑक्सिजन अभावी ...

महाराष्ट्रात २४ तासांत राज्यात ५६८ करोना रुग्णांचा मृत्यू; ...

महाराष्ट्रात २४ तासांत राज्यात ५६८ करोना रुग्णांचा मृत्यू; ६७,४६८ नवे करोनाबाधित
राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची तयारी होत आहे. राज्य सरकारने आधीपासूनच कठोर ...

ऑक्सिजनच्या तुटवडा दूर करण्यासाठी टाटा उद्योग समूहानं ...

ऑक्सिजनच्या तुटवडा दूर करण्यासाठी टाटा उद्योग समूहानं मदतीचा हात पुढं केला
सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. वाढत असलेल्या रुग्ण ...

अंबाजोगाईत ऑक्सिजन बंद झाल्याने 6 जणांचा मृत्यू, ...

अंबाजोगाईत ऑक्सिजन बंद झाल्याने 6 जणांचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ...

भारत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात अपयशी का ठरला?

भारत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात अपयशी का ठरला?
गेल्या महिन्याच्या म्हणजे मार्चच्या सुरुवातीला भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी घोषित ...