मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (14:06 IST)

Army Day : सैनिकांच्या हाती सीमा सुरक्षित देशाची

सैनिकांच्या हाती सीमा सुरक्षित देशाची,
ही बाब आमच्या साठीही असे गौरवाची,
प्रत्येक सैनिक आन, बान, शान या भारतभू ची,
छाती फुलते सांगता गाथा त्यांच्या पराक्रमाची,
लाखो झालेत अनेक ही होतील अमर,
आमच्या साठी तर प्रत्येक सैनिक जणू ईश्वर,
निश्चिन्त मनांन आम्ही राहतो या देशात,
सैनिक मात्र गुंतला, देश संरक्षणात,
न पर्वा कशाची, न चिंता घरादाराची,
ऊन वारा पाऊस, तमा न कशाची,
अहोरात्र सेवा अन बलीदान देशासाठी,
सैनिकांस ठाऊक, लागते त्यास जिद्द मोठी.
अश्या या महान सैनिकांना मुजरा मानाचा,
गाऊ आम्ही गाथा त्यांच्या शोर्या च्या !
...अश्विनी थत्ते