बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 25 ऑक्टोबर 2018 (09:06 IST)

हिंदूंच्या सणांवर कोर्टाचे फटाके

कोर्टाने निर्णय दिला अन संपुर्ण सोशल मिडीयावर एक कल्ला हिंदूच्या सणाच्या वेळेलाच कस काय सुचतं कोर्टाला असले निर्णय द्यायला. कोर्टाने हिंदू समाजात किती हस्तक्षेप करावा हेही ठरवून घ्यावं. असो हिंदू ह्या निर्णयावर फार नाराज झालाय यात काळीमात्र शंका नाही.
कोर्टाचे निर्णय जरी सर्वांसाठी असले तरी एक प्रकारचा दिवाळी सण साजरा करण्यावर कोर्टाने घातलेलं हे हिंदू समाजाला पारतंत्र्या समान आहे. तसा निर्णय स्वागत करण्यासारखा असला तरी सध्या हिंदू ह्या वेळी तरी निर्णयाचा स्वागत करता येणार नाही .इतर बर्याच गोष्टी अशा आहेत कि त्यांच्यामुळे ही प्रदूषन होतच. तेही थांबवलं पाहीजे.
 
सध्या फेसबुकवर बरीच चर्चा चालू आहे अन कोर्टाची सोईस्कर खिल्ली उडवली जात आहे. ही गोष्ट कोर्टचा अपमान करणारी जरी असली तरी हिंदूंनी 8 ते 10 वेळेत फटाके फोडू नये. पण हा निर्णय म्हणजे हिंदूच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला नाही का अन अस किती टक्के प्रदूषन होत असावं फटाक्यांमुळे तेही कोर्टने बघावं. वातावरण दूषित होणार्या किती गोष्टींवर कोर्टाने बंदी आणली आहे. कुणी येड्याने याचिका टाकली कि कोर्ट निर्णय द्यायला तयार होतं.पण कोर्ट अशाच प्रकारचे निर्णय देत आजही बर्याच वेगवेगळ्या केसेस पेंडींग आहेत त्यावर कुणी भाष्य नाही करणार. कोर्ट त्यांवरही निर्णय कधी देणार पण कोर्टाला बाकी अति महत्वाच्या निर्णयापेक्षा फक्त हाच निर्णय अति महत्वाचा वाटला अन यावर एवढ्या लवकर निर्णय देवून कोर्ट मोकळं झालं. कोर्टाने आता सर्वे करावा कि जास्त प्रदूषन कशाने होतं अन त्या तुलनेत फटाक्यांच प्रदूषण किती होतं हेही बघाव कोर्टने, असो पण निर्णय तसा योग्यच आहे पण हेही तपासलं पाहीजे जर 8 ते 10 वेळात जे प्रदूषन होईल ते 10 ते 12 यावेळात नाही का होणार अन तेव्हा प्रदूषण होणार असेल तर कोर्टाने कुठल्या जजमेंटवर हा निकाल दिला.8 ते 10 ह्या वेळेत प्रदूषण होणार नसेल तर इतर वेळेलाही प्रदूषण कस होईल. नक्की निर्णय दोघ पक्षांच्या भावना दु:खवू नयेत या हेतू ने दिला गेलाय. पण हिंदू खुप चिडलाय जज साहेब ह्या निर्णयाने बाकी केसेस यांचे निर्णयही कोर्ट असाच लवकर लावेल का हाही प्रश्न आहेच.
 
सरन्यायाधीश गोगाई यांनी जनहीत याचिकांवर निर्णय देण्यासाठी विशिष्ट नियमावली आखलीय. अन याही निर्णयात अवलंबली असेलच अशी आशा करतो. कारण गोगाई यांनी प्रशांत भूषनांना रोहींग्याविषयीच्या याचिकेत फार सुनावलं होत. अन एक जनहीत याचिकेसंदर्भात नियमावली तयार केली आहे. अति महत्वाच्या जनहित याचिकावरच लवकरात लवकर सुनावणी व्हावी अन ती लगेच निकाली काढावी असा नियम तयार केलाय. कुणीही उठतं अन कायद्याचा बरोबर वापर करुन हिंदूंना त्रास देण्याचा विचारातच जनहीत याचिका टाकली जाते.कोर्टाने याचाही विचार करावा याचिका आताच टाकण्याचे कारण ही कोर्टाने विचारावे. कि एवढी वर्ष काय झोपला होता की आताच असल्या पद्धतीच्या याचिका टाकत आहेत. ज्यावेळेला हिंदूचा सणजवळ येतो. याचिका कर्त्याची मानसिकता काय आहे हे ही बघन गरजेच आहे.
 
होळी आली टाक याचिका पाण्याचे संपतायेत म्हणून फक्त दूष्काळ ह्या मुळेच आला असावा अस यांना वाटायला लागत. गणपती आले टाक याचिका पाणी दूषित होतं, जसे दररोज हे याचिका कर्तेच त्या तलावात त्या समुद्रत पाणी प्यायला जातात. कोर्टाने हिंदू सण जवळ आले अन असल्या याचिका आल्या की निर्णय देवूच नयेत. खरच याचिकेत काही तथ्य असेल तर काही अडचण नाही पण उगाच हिंदूना डिवचण्यासाठीचे प्रकार मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत अन का खपवून घ्यावेत जज साहेब.हा सोईस्कर रित्या हिंदूना त्रास देण्याचा अन हिंदूंच्या आनंदावर विर्जन टाकण्याचा प्रकार आहे. खरच पर्यावरणाला हिंदू सणांपासून धोका नाही तर तर रुतूमानांनुसारच हिंदूचे सण येतात पर्यावरणाच भान ठेवून हिंदू सणा साजरे करत असतो.
Virendra Sonawane