1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Updated : गुरूवार, 11 मार्च 2021 (16:27 IST)

निबंध : शिस्तीचे महत्त्व

The Importance of Discipline Marathi  Essay
आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात शिस्तीचे महत्त्व आहे. शिस्तीचे धडे शालेय जीवनापासून गिरविले जाते. प्रत्येक जण ह्याच्या कडे गांभीर्याने बघेल असे नाही. शिस्त ही मानवाला यशस्वी बनवते. शिस्तीचे काटेकोर पालन केल्याने माणूस यशस्वी होतो. 
शिस्तीचे नियमाचं पालन करावे असं शाळेत किंवा कॉलेजात दाखला घेतल्यावर सांगितले जाते. काही दिवसानंतर ते नियम बंधन वाटू लागतात जाच होत आहे असं वाटू लागत. मुलांना लहान पणापासून संस्काराची शिदोरी मिळावी आणि त्यांनी आयुष्यात खूप प्रगती करावी,खूप मोठे व्हावे असं प्रत्येक शिक्षकाला वाटते. शिस्तीचे हे नियमांच्या पालन करविण्यामागे पालकांना किंवा विध्यार्थ्यांना त्रास व्हावा असा काही उद्देश्य शिक्षकांचा किंवा शाळेचा नसतो. विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा हाच उद्देश्य त्यामागे असतो .या साठी पालकांनी देखील शाळेला आणि शिक्षकांना सहभाग करावे. मुलांना पाठीशी घालू नये.त्यांच्या केलेल्या चुकांवर पांघरूण घालू नये. शिस्त लावण्यात त्यांनी देखील सहभाग करावे. 
जीवनात पुढे यशस्वी व्हायचे असेल तर शिस्तीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. या साठी आपल्या कडे ज्ञान, बुद्धिमत्ता, चिकाटी,जिद्द, आणि श्रम करण्याची इच्छा असावी. तरच आपण कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकाल. या साठी शाळेतून मिळालेले अभ्यास पूर्ण करणे.शाळेत गणवेषात जाणे, आई वडिलांना दररोज नमस्कार करणे, सगळ्यांशी प्रेमाने वागणे बोलणे. वेळेचे बंधन पाळणे असे काही नियम आहे ज्यांना अवलंबवून आपण यश मिळवू शकाल.  
रहदारीचे काटेकोर नियम पाळणे, मोबाईलचा अतिवापर टाळणे, असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्या मध्ये शिस्त महत्त्वाची आहे.  
प्रत्येक क्षेत्रात शिस्तबद्धतेचे पालन केले जाते मग ते सैनिक असो किंवा पोलीस त्यांना शिस्तीचे कडक नियम पाळावे लागतात. 
मुके प्राणी देखील शिस्तीचा पालन करतात. आपण स्वतः शिस्तीचे महत्त्व समजून त्याचे पालन करून सुजाण नागरिक बनावे.