1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (15:24 IST)

कोरोनाकाळात लग्न करताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी ...

some things
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. मात्र कोरोनाकाळात लग्नाचं आयोजन करताना बर्यावच आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. पाहुण्यांना बोलवण्यापासून सामाजिक अंतर राखणं, मास्क परिधान करूनही स्टायलीश दिसणं, सॅनिटायझरचा वापर अशा बर्या्च गोष्टी कराव्या लागत आहेत. भारतीय लग्नं शाही थाटात केली जातात. या लग्नामध्ये विविध सोहळ्यांचं आयोजन होतं, पाहुण्यांचीही रेलचेल असते. अशा परिस्थितीत कमी लोकांमध्ये लग्न करणं थोडं विचित्र वाटतं. पण यावरही पर्याय आहेत. थोडी कल्पकता दाखवून आणि विचारविनिमय करून कोरोना काळातही ड्रीम वेडिंग करता येईल. कोरोनाकाळात लग्न करताना नेमकं काय करता येईल याविषयी...
 
* सध्या ‘मिनिमोनी' हा शब्द चांगलाच गाजतोय. ‘मिनीमोनी' म्हणजे ‘मिनी सेरेमनी'. मिनिमोनीच्या आयोजनात अगदी मोजक्या, जवळच्या लोकांना बोलावलं जातं. यावेळी वधुवरांप्रमाणे नटून थटून फोटोशूट करता येईल. पण लग्नाचे विधी करता येणार नाहीत. यासाठी वेगळा मुहूर्त काढावा लागेल. यावेळी फक्त घरचे लोक उपस्थित असतील.
* मायक्रो वेडिंगचीही चलती आहे. अशी लग्नं 20 माणसांमध्ये लागतात. या छोटेखानी लग्नांमध्ये तुम्ही बिनधास्त मजा करू शकता. अर्थात कोरोनाचे नियम पाळूनच!
* घरात एकच लग्न असेल आणि अधिक पाहुण्यांना बोलवायचं असेल तर तुम्ही लग्नसोहळ्यांची विभागणी करू शकता. हळदी, संगीत, गृहमुख, लग्न, स्वागत समारंभ अशा वेगवेगळ्या प्रसंगी माणसांची विभागणी करता येईल.
* याच पद्धतीने मल्टी डे वेडिंग करता येईल. म्हणजे लग्नसोहळ्याआधी प्री वेडिंग लंग्नाचं आयोजन करता येईल. लग्नानंतर जेवण ठेवता येईल. काही पाहुण्यांसाठी ब्रंचचं आयोजन करता येईल. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पाहुण्यांना बोलावून लग्नसोहळा संस्मरणीय करता येईल.
* लग्नाच्या ठिकाणी काही फलक लावता येतील. या फलकांवर मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक दुरावा, कोरोनाचा धोका अशा सूचना लिहून कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्याबाबत विनंती करता येईल. 
अशा पद्धतीने कोरोनाकाळातही सुरक्षित विवाहसोहळे आयोजित करता येतील.