1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 (13:12 IST)

जगातील सर्वाधिक अंतराच्या फ्लाईटचे उड्डाण

katar flight
जगातील सर्वात लांब अंतराच्या कतार एअरलाईन्सच्या  क्यू आर ९२० दोहा ते ऑकलंड या फ्लाईटचे पहिले उड्डाण रविवारी सायंकाळी पाच वाजता झाले असून तो सोमवारी  सकाळी ७ वाजता ३0 मिनिटांना ऑकलंडला पोहोचणार असल्याचे कतार एअरलाईन्सने जाहीर केले आहे. 

ही फ्लाईट या वेलाळ पाच देश व दहा टाईम होम पार करणार असून   14535 कि.मी.चा प्रवास सोळा तासात पूर्ण काणार आहे.  या प्रवासी फ्लाईटमध्ये  प्रवाशांची सख्या जाहीर  केलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार यात चार पायलट व १५ कू मैंबर आहेत. गतवर्षी मार्चमध्ये एमिरेट्स एअरलाईन्सच्या दुबई ते ऑकलंड या नॉनस्टॉप फ्लाईटने जगातील  सर्वाधिक अंतराची फ्लाईट म्हणून रेकॉर्ड नोंद‍विले होते. या फ्लाईटने  एकाच उड्डाणात 14200 कि.मी.चे अंतर पार केले होते.