शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (13:58 IST)

व. पु. काळे यांचे जीवनाबद्दल विचार

*खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
*आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती हवी असते.
*आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फाय भयप्रद आहे.
*संवाद दोनच माणासांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात.
*सुरुवात कशी झाली यावरच बर्‍याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
*अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
*माणसाने डोक्यात काही ठेवू नये नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.
*खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.
*खर्‍या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
*कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.