शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (16:48 IST)

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती"

कोथरूड भागात घडलेली ही एक सत्यघटना ! 
कोथरूडच्या रोटरी क्लब मध्ये 'ब्लड डोनर्स' ची लिस्ट तयार केलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन येतो, "एका मुलाचा अपघात झालाय. खूप रक्त वाहतंय. O- blood grp असलेले कुणी डोनर असतील तर त्यांचे नाव व पत्ता मिळेल का?" लिस्ट चेक केली जाते व त्या व्यक्तिचे नाव व पत्ता त्या फोन करणार्या व्यक्तिला दिला जातो. ते कार्यकर्ते गाडी घेऊन त्या पत्त्यावर जायला निघतात. घराच्या जवळ गाडी येते. बघतात तर काय, एक ग्रुहस्थ रस्त्यावर येऊन कुणाची तरी वाट बघत असल्यासारखे उभे असतात. ते गाडीला हात करून थांबवतात. 
 
".......हाँस्पिटल मधून आलात ना. मीच आहे डोनर. हे माझे कार्ड". कार्यकर्ते झटकन गाडीचे दार उघडून त्यांना गाडीत घेतात. त्यांच्या चेहर्यावर अजूनही प्रश्नचिन्ह असतं. काका खुलासा करतात.."मलाही फोन आला होता, काही कार्यकर्ते तुम्हाला न्यायला येतील म्हणून. तुम्हाला घर शोधायला अडचण येऊ नये म्हणून बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो."...हॉस्पिटल येते. काका ब्लड डोनेट करतात. त्या जखमी मुलाला ते रक्त दिले जाते. त्याचा जीव वाचतो. कार्यकर्ते परत काकांना घरी सोडायला निघतात. त्यांच्या घराच्या गल्लीत गाडी वळते. लांबूनंच काका म्हणतात, "इथेच सोडा मला. जातो मी पुढे माझा माझा". 
 
ती मुले गाडीतून बघत असतात काकांच्या घराकडे. ती म्हणतात," काका, तुमच्या घरापुढे एव्हढी गर्दी कसली दिसतीये? काय झालंय? Anything serious? आम्ही येऊ का आत?"...... काका शांत होते. मग उत्तरले, "आता सांगायला हरकत नाही. सकाळी तुम्ही आलात तेंव्हा माझ्या एकुलत्या मुलाचे निधन झालेले होते. त्याचे पार्थिव घरात आणलेले होते. इतक्यात क्लब मधून रक्ताची गरज असल्याचा फोन आला. माझा रेअर ग्रूप आहे. मी एक क्षण विचार केला, माझा मुलगा आता काही केले तरी परत येणार नाही. पण कुणाच्या तरी मुलाचे प्राण मी वाचवू शकतो. मी निर्णय घेतला. पहिले ब्लड डोनेशन करून यायचे. मग अंत्यसंस्कार !. पण तुम्हाला हे समजलं असतं तर तुम्ही मला घेऊन गेला नसता. म्हणून मी घरापर्यंत तुम्हाला येऊच दिलं नाही व मी बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो. पण आता शेवटी ते तुम्हाला समजलंच". 
 
कार्यकर्ते सुन्न झाले. डोळे फाडून ते काकांच्या पाठमोर्या आक्रुती कडे बघत राहिले. गाडी वळवायचे भान ही त्यांना राहिले नाही. नकळत त्यांचे हात जोडले गेले.
 
- सोशल मीडिया