गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

एव्हरेस्टची उंची पुन्हा मोजणार!

जगातील सर्वांत उंच पर्वतशिखर मानल्या जाणार्‍या माउंट एव्हरेस्टची उंची सर्व्हे ऑफ इंडिया तर्फे पनु्हा मोजली जाणार आहे. नेपाळमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची कमी झाली असल्याची जगभरातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्या पाश्वभूमीवर हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.
 
याबाबत माहिती देताना भारताचे सर्व्हेअर जनरल स्वर्ण सुब्बाराव म्हणाले यासाठी लागणार्‍या आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून या मोजणीचा सर्व अभ्यासकांना लाभ होईल. एव्हरेस्टवर आम्ही या महिन्याभरात गिर्यारोहकांचे पथक पा‍ठविणारा आहोत. 1855 मध्ये एव्हरेस्टची उंची जाहीर करण्‍यात आली. त्यानंतर अनेकांनी या खिराची उंची मोजली. मात्र आजही जगात सर्व्हे ऑफ इंडियाने मोजलेली एव्हरेस्टची उंची प्रमाण मानली जाते. एव्हरेस्यची उंची 29 हजार 28 फूट आहे. आम्ही ती पुन्हा मोजणार आहोत.
 
ते म्हणाले, नेपाळमध्ये दोन वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला. त्यानंतर एव्हरेस्टची उंची कमी झाली असल्याचे जगभरातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. पुन्हा नव्याने उंची मोजण्यामागचे हे प्रमुख कारण आहे. त्याबरोबर शास्त्रीय अभ्यासासाठी तसेच भूस्तर हालचालींची माहिती होण्यासाठीही याची मदत होणार आहे. साधारणपणे यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागेल. पहिल्या महिन्यात उंची मोजली जाईल, त्यानंतर पंधरा दिवस मिळालेल्या माहितीचे संगणकीकरण करून उंची जाहिर करण्यात येईल.