शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By वेबदुनिया|

गगनभरारी....नव्या वर्षाची...नव्या संकल्पाची!

आणखी काही तास, मिनिटे, सेकंद... प्रत्येक क्षण सरकत जाईल आणि नव्या वर्षाच्या स्वागताता बिगूल वाजेल. प्रत्येक जल्लोषाची तर्‍या वेगळीच. कुठे सामिष, तर कुठे सात्विक. एकीकडे कोलावरीच्या ठेक्यावर पाय थिरकत असतील तर दुसरीकडे मंदिरातील घंटानादात माथी नतमस्तक होत असतील. नव्या वर्षाचा जल्लोष घराच्या दिवाणखान्यातील टीव्ही सेटपासून रस्त्यावर अवतरेल आणि बरोबर 12च्या ठोक्याला सरत्या वर्षाला निरोप दिला जाईल. उत्तररात्र रंगत जाईल तसा जल्लोषही तारसप्तकात पोहोचेल. नव्या वर्षाची पहाट होईल तेव्हा कोणी गगनभरारी घेईल नव्या संकल्पाची... पण त्यासाठी रात्रभर जागायला मात्र हवं!

वाहने सावकाश चालवा, वाहतूक पोलिसांना सहकार्य करा. 
अतिमद्यापन करू नका, मद्यपान केल्यावर ड्रायव्हींग करणे टाळा. 
धांगडधिंगा करू नका, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. 
सायलेन्स झोनच्या नियमांचे उल्लंघन करू नका. 
सेलिब्रेशन करताना आजूबाजूच्या संशयास्पद घडामोडींवर लक्ष ठेवा. 
काही संशयास्पद आढळल्यास त्याची सूचना पोलिसांना द्या.