Police Commemoration Day 2024 : पोलीस स्मृती दिन  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  21 आक्टोंबर 1959 ला लडाख मधील हॉट स्प्रिंग्स मध्ये मोठ्या हत्यारांसह लैस चीनी सैनिकांकडून केल्या गेलेल्या हल्ल्यात दहा पोलीस कर्तव्यावर तैनात असताना शहीद झाले होते. तेव्हा पासून प्रत्येक वर्षी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या इतर सर्व पोलिसांचा सन्मान करण्यासाठी 21ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.
				  													
						
																							
									  
	 
	तसेच या दिवशी विविध देशभरात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली जाते. व देशभरात सर्व पोलीस स्टेशन आणि मुख्यालयात शोक सभा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये शहीदांच्या फोटोसमोर मेणबत्त्या प्रज्वलित केल्या जातात, हा कार्यक्रम पोलिस दलाचाही प्रेरणास्रोत बनतो.
				  				  
	 
	उद्देश-
	या दिवसाचा मुख्य उद्देश पोलिस दलाबद्दल आदर व्यक्त करणे आणि त्यांच्या सेवेचे कौतुक करणे हा आहे, तसेच, समाजात सुरक्षेविषयी जागरुकता वाढविण्याचे हे एक महत्त्वाचे माध्यम आहे, हा दिवस लोकांना आठवण करून देतो की सुरक्षेसाठी पोलिस दलाचे योगदान आहे चे खूप महत्वाचे आहे.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	तसेच दिल्लीतील इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन कुमार डेका म्हणाले की, आज पोलीस स्मृती दिनानिमित्त आपण सर्वजण त्या शूर पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहू या. ज्यांनी गेल्या वर्षी देशासाठी बलिदान दिले. 21 ऑक्टोबर 1959 रोजी सीआरपीएफच्या 10 शूर जवानांनी देशासाठी बलिदान दिले. तसेच त्या दिवसापासून आपण दरवर्षी 21ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करतो. गेल्या वर्षी 216 पोलिसांनी देशासाठी बलिदान दिले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत 36,468 पोलिसांनी देशासाठी बलिदान दिले आहे.
				  																								
											
									  Edited By- Dhanashri Naik