testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मृत्यूचा अनुभव घेण्यासाठी या मंदिरात होते गर्दी

punarjam
Last Modified गुरूवार, 1 मार्च 2018 (12:40 IST)
पुनर्जन्म आहे किंवा नाही या संदर्भात अनेक ते व्यक्त होतात. पुनर्जन्म आहे असा विश्र्वास असणारे या संदर्भात अनेक कथा सांगतात. त्या किती खर्‍या, कितीखोट्या हे कुणीच सांगू शकत नाही मात्र जगात एक असाही देश आहे ज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पुनर्जन्म
ही संकल्पना कारणीभूत ठरली आहे. या देशाचे नाव आहे थायलंड. राजधानी बँकॉक पासून 60 मैलांवर असलेल्या प्रोमानी वाट या बुद्धंदिरात भाविकांच्या रांगा असतात मात्र या रांगा पुनर्जनचा म्हणजेच अगोदर मरणाचा अनुभव घेण्यासाठी लागतात. येथे पुनर्जन्म घेण्याची सोय केली जाते. अर्थात त्यासाठी खरेखुरे मरण्याची गरज नाही हे विशेष. येथे खोटेखोटे मरण्याचा अनुभव घेता येतो. जगात विविध देशात मृत्यूनंतर अनेक प्रकारची कर्मकांडे केली जातात. थायलंड मध्येही अशी कर्मकांडे होतात. या बुद्ध मंदिरात मृत्यूचा आणि त्यानंतर पुनर्जन्माचा अनुभव घेण्यासाठी जे कर्मकांड केले जाते त्यानंतर आपोआपच आपला पुनर्जन्म झालाय यावर विश्र्वास बसतोच. या अनुभवासाठी येथे 9 ताबूत असून ते रंगविलेले आहेत. भाविकाला यात झोपविले जाते. याचा अर्थ तुमचा सांकेतिक मृत्यू झाला. 90 सेकंद या अवस्थेत राहिल्यावर पुजारी भाविकाला उठवितो. त्यानंतर भाविकाने उभे राहून प्रार्थना करायची की त्याचा पुनर्जन्म झाला असे समजतात. अर्थात या अनुभवासाठी लाखो रुपये मोजावे लागतात.


यावर अधिक वाचा :

सरकार नरमले अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ स्थगित

national news
अखेर राज्य सरकार नरमले असून अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा ...

न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थगितीचा निर्णय कसा होऊ शकतो - ...

national news
​अंगणवाडी सेविका मानधनावर काम करतात. त्या शासनाच्या सेवक नाहीत. त्यामुळे त्यांना मेस्मा ...

आंबेडकर यांच्या बद्दलचे ट्विट क्रिकेटर पांड्याला भोवणार

national news
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका ट्विटमुळे क्रिकेटपटू हार्दीक पांड्या ...

मियामी खुले टेनिस : टीनऐजर अनिसिमोव्हा विजयी

national news
अमेरिकेची टीनएजर टेनिस खेळाडू आमांडा अनिसिमोव्हा हिने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला ...

महिलांच्या आयपीएलसाठी ही योग्य वेळ नाही : मिताली

national news
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...

डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

national news
फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने ५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली ...

गुगलचे प्ले इंस्टेंट लॉन्च, युजर्सला प्ले स्टोरमध्ये गेमचे ...

national news
गुगलने गुगल प्ले इंस्टेंट लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स प्ले स्टोरमध्ये गेमचे ...