नैवेद्यासाठी पुरणच का?

puran poli
Last Modified सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (10:51 IST)
अत्री ऋषी आणि अनुसूया एकदा महादेव आणि पार्वतीकडे जेवणाचं आमंत्रणं घेऊन जातात. सर्वांना जेवायला बोलावतात. कार्तिक घरी नसतो पण गणपती असतो. छोट्या गणपतीला घेऊन यायचा ते आग्रह करतात. पण पार्वतीला गणेशाची क्षुधा माहीत असते म्हणून ती त्यांना सांगते की ती व महादेव येतील आणि कार्तिक परत आला की पुन्हा एकदा सगळे येतील. पण अत्री पुन्हा त्यांना गणपतीला घेऊन यायचा आग्रह करतात आणि पार्वतीचा नाईलाज होतो.
महादेव, पार्वती आणि गणपती तिघे ठरलेल्या दिवशी अत्री ऋषींकडे जेवायला जातात पण पार्वतीला चिंता असते ती गणपतीच्या भुकेची आणि अनुसूये कडील सगळं जेवण संपलं तरी याची भूक शमणार नाही हे तिला माहीत असते.
जेवण सुरू होतं आणि अनुसूया एकेक पदार्थ वाढायला सुरू करते. छोटा गणपती खूप आनंदाने जेवतोय पाहून अनुसूयेला ही बरं वाटत.

महादेव आणि पार्वतीचं जेवण संपतं पण गणेशाचं ताव मारणं सुरू राहतं. पार्वती त्याला खुणावत असते आणि बस म्ह्णून सांगायचा प्रयत्न करते पण गणपतीचं सगळं लक्ष जेवणात.

अनुसूयाला पण आता काळजी वाटायला लागते कारण सर्व प्रकार संपत आलेले असतात. तरीही गणपतीची काही थांबायची चिन्हे दिसत नाहीत. आणि एकदाचे सगळं जेवण संपतं पण अजून गणपतीची भूक काही भागलेली दिसत नाही. मग अनुसूया स्वयंपाक घरात जाते आणि घरी जे असतं त्यातून एक सारण तयार करते आणि त्याला पिठाच्या आत बंद करून घेऊन येते. आणि गणपतीला सांगते की, "मी माझ्याकडे जे सर्व होतं (पूर्ण) ते श्रद्धापूर्वक यात घालून आणलं आहे त्याचा स्वीकार कर".


गणपती तो पदार्थ खातो आणि तृप्त होतो आणि जेवण संपवतो.
म्हणून त्या पदार्थाला पुरण (जे पूर्ण आहे ते) अस म्हटलं गेलं. आणि ते पुरण मोदक रुपात (श्रध्दा आणि मातृत्वा च्या बंधनात बांधलेलं) गणपतीला दिल्यावर गणपतीची भूक शमली आणि तो तृप्त झाला.

म्हणून हिंदू लोकांत सणासुदीला पुरण केलं जातं. देवाला आपण जे पूर्ण श्रद्धेने अर्पण करतो ते आवडतं.

साभार- सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

कोरोनाविरोधात लढण्याची सविस्तर योजना सादर करा- सुप्रीम

कोरोनाविरोधात लढण्याची सविस्तर योजना सादर करा- सुप्रीम कोर्ट
देशातील कोरोना स्थितीची दखल घेत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे. सुप्रीम ...

नरेंद्र मोदी घेणार उद्या उच्चस्तरीय बैठक, पश्चिम बंगाल दौरा ...

नरेंद्र मोदी घेणार उद्या उच्चस्तरीय बैठक, पश्चिम बंगाल दौरा केला रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. ही बैठक ...

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ती स्कुटीवर 180 किमी प्रवास करत ...

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ती स्कुटीवर 180 किमी प्रवास करत मध्यप्रदेशातून महाराष्ट्र पोहचली
जिकडे तिकडे कोरोनाची भीती पसरलेली, सर्व राज्यांमध्ये स्थिती गंभीर, शहरांमध्ये लॉकडाऊन ...

हे वसुंधरे कित्ती देशील आम्हास...

हे वसुंधरे कित्ती देशील आम्हास...
हे वसुंधरे कित्ती देशील आम्हास, कण कण तुझा ग माते येतो कामास, काय काय पेलले स ग तू ...

चक्क शेळ्या-मेंढ्या बाजार भरवून शासनाच्या आदेशाला हरताळ !

चक्क शेळ्या-मेंढ्या बाजार भरवून शासनाच्या आदेशाला हरताळ !
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरात शेळ्या व मेंढ्याचा खरेदी-विक्रीचा बाजार भरवून ...