सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 24 डिसेंबर 2024 (12:16 IST)

Sane Guruji Jayanti 2024: पांडुरंग सदाशिव साने जयंती

sane guruji
Sane Guruji Jayanti 2024: भारत देशाचे राष्ट्रीय शिक्षक आणि गुरुजी म्हणून सैदव आठवण येणारे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी हे एक प्रसिद्ध मराठी लेखक, स्वतंत्रता सेनानी, सामाजिक कार्यकर्ता आणि मायाळू शिक्षक होते.  
 
साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने आणि आईचे नाव यशोदाबाई साने होते. साने गुरुजी हे देशभक्तही होते आणि राष्ट्रसेवेला पूर्णपणे समर्पित होते. तसेच ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहे. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आईच्या शिक्षणाचा खूप प्रभाव पडला. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. प्रताप हायस्कूलमध्ये वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. वसतिगृहात राहूनच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचा धडा शिकवला. अमळनेर येथे तत्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्वज्ञानाचे शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या अध्यापन कौशल्याचा उपयोग सामाजिक हितासाठी केला. तसेच शाळेत शिकवत असताना त्यांनी 1928 मध्ये 'विद्यार्थी' नावाचे मासिक सुरू केले. 
 
महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. 1930 मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली. शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी सविनय कायदेभंग उपक्रमात भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’नावाचे साप्ताहिक काढले. स्वातंत्र्यानंतर साने गुरुजींनी समाजवादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी 1948 मध्ये 'साधना' नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्यांनी लिहिलेल्या 70 हून अधिक साहित्यकृतींशिवाय साने गुरुजींनी सी.आर. दास आणि गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्तांची चरित्रेही लिहिली. त्यांची ‘स्वीट टेल्स ऑफ गांधीजी’ आणि ‘पीक्स ऑफ हिमालय’ ही पुस्तकेही खूप गाजली. तसेच 'श्यामची आई' ही त्यांची साहित्य कृती आजही लोकप्रिय आहे. 

Edited By- Dhanashri Naik