राष्ट्रीय युवा दिन : स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार
स्वामी विवेकानंद यांची आज 12 जानेवारी रोजी जयंती म्हणून हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या उत्सवाचा मुख्य ध्येय म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार करणे. युवकांच्या शाश्वत ऊर्जेला जागृत करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
"जो पर्यंत तुम्ही स्वतः वर विश्वास ठेवत नाही.
तो पर्यंत देवही तुमच्या वर विश्वास ठेवू शकत नाही."
उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय थांबु नका.
कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नाहीतर हात जोडा. आपल्या भावांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.
जो व्यक्ती संसारातील गोष्टीमुळे व्याकुळ होत नाही. त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केल आहे.
विश्व हे एक व्यायामशाळा आहे. आणि आपण इथे स्वतः ला मजबुत बनवण्यासाठी आलो आहे
एक कल्पना घ्या. त्या कल्पनेला आपल्या जीवनाचा भाग बनवा. त्यावर विचार करा, त्याचे स्वप्न बघा. मेंदु, मांसपेशी, नसा आणि शरीराच्या प्रत्येक भागात ती कलपना सामावून घ्या. बाकीच्या विचारांना बाजुला ठेवा. हीच यशस्वी होण्याची पध्दत आहे.
देवाला आपण कुठे शोधणार? जर आपल्याला देव स्वतः च्या ह्रदयात आणि जिवंत प्राण्यात दिसत नसेल.
कुठल्याही गोष्टीची भिती मनात बाळगु नका. तुम्ही अद्भुत काम कराल, हा निर्भीड पणाच तुम्हाला क्षणभरात परम आनंद देईल.