शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

पकडली गेली 4 कोटी रुपयांची पाल

आपल्या घराच्या भीतीवर पाल दिसली की आम्ही तिला पळवून लावतो पण काय एखाद्या पालीची किंमत 4 कोटी रुपये असू शकते? ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी ही बाब अगदी खरी आहे. आणि या कोटी रुपयांच्या महागड्या पालीचा उपयोग जाणूनही आपल्या आश्चर्य वाटेल. 
 
बंगालच्या जंगलात एक लुप्‍तप्राय पालीचे तस्‍कर पकडले गेले आहेत. सुमारे साडे चार कोटी रुपये किंमत असलेल्या या पालींपासून औषध तयार केलं जातं. यातील एक-एक पाल एक-एक कोटी किंवा त्याहूनही अधिक किमतीची असू शकते.
 
बंगालमध्ये 4.5 कोटी रुपये किंमत असलेल्या दुर्लभ पाली जप्त करून तस्करांना अटक करण्यात आली आहे. उत्तर बंगालच्या फालाकाटा येथील जंगलातून सशस्त्र सीमा बळ अर्थात एसएसबी द्वारे यांना अटक करण्यात आले. या तस्करांकडून दुर्लभ प्रजातींच्या सहा पाली जप्त केल्या गेल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात यांची किंमत साडे चार कोटी रुपये असण्याचा अंदाज बांधला गेला आहे.
या दुर्लभ पालीचे नाव टोके गेक्को आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यांची किंमत अधिक असल्यामुळे तस्कर या पाली चीनमध्ये विकतात अशी माहिती समोर आली आहे. चीनमध्ये या दुर्लभ पालीचा उपयोग करून औषधं तयार केली जातात.