गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

व्हेल गातो गीत

आर्कटिक सागरात राहणारा धनुषाकार डोकं असलला विशाल व्हेल मासा 200 वर्ष जगू शकतो. लहान जीव खाउन आपलं पोट भरणारा व्हेल मासाबद्दल एक रोचक गोष्ट माहीत पडली आहे. मासा पाण्यात गाणी गातो.
 
बोहेड व्हेलों चे गीत ऐकणार्‍यांनी याला उत्कृष्ट जैज आर्टिस्ट म्हटले आहे. शोधकर्त्यांनी 2010 ते 2014 च्या ग्रीन लँडच्या पूर्वीबाजूच्या समुद्रात सुमारे 300 व्हेल मासांवर रिसर्च करत मायक्रोफोनद्वारे त्यांचे गीत ऐकले. या दरम्यान बोहेड व्हेल च्या गाण्यांचे रिकॉर्ड याचे संग्रह करण्यात आले. वेगवेगळ्या सुरांमध्ये सजवलेल्या एकूण 184 गाण्यांची ओळख पटवण्यात आली. साधरणात: नर प्रजनन दरम्यान गीत गातात.
 
बोहेड व्हेल चा अनेक शतकांपूर्वी मोठ्या प्रमाणात शिकार होत होता आणि ही प्रजाती विलोपन च्या कडापर्यंत पोहोचली होती. सुमारे 60 फीट अर्थात 18 मीटर पर्यंतची लांबी असलेल्या या व्हेल पूर्णवर्ष आर्कटिक सागरात दिसतात. इतर व्हेलच्या तुलनेत यांची चरबी अधिक जाड असते.
 
व्हेल मासांमध्ये केवल बोहेड आणि आणि हम्पबैकच वेगवेगळ्या प्रकाराचे गाणी गातात. ब्लू, फिन किंवा मिंके व्हेल सोपे गीत गातात आणि दरवर्षी एक किंवा दोन गाणी गात असतात. वॉशिंगटन यूनिवर्सिटीच्या समुद्रविज्ञानीच्या स्टैफोर्ड यांचे म्हणणे आहे की हम्पबैक गीत पहु व्यवस्थित असून शास्त्रीय संगीतासारखे जाणवतात. तसेच बोहेड गीत जरा फ्रीस्टाइल प्रकाराचे आहे जसे जैज म्यूझिकसारखे ज्याचे स्पष्ट नियम नाही.
 
समुद्र जीवविज्ञानी किट कोवैक्स यांनी सांगितले की "ते विविधतांनी भरलेले आहेत, काही तर अगदी पुन्हा आठवणीत येणा्‍या गीतांसारखे ऐकू येतात. तसेच इतर ऐकून असे वाटतं जसे कुठून जंगली आवाज येत आहे."
 
व्हेल आवाजाचा वापर रस्ता दाखवणे, संवाद साधणे, शिकार करणे आणि साथीदाराला शोधण्यासाठी केला जातो. पाण्यात आवाज प्रकाशच्या तुलनेत अधिक लांबीपर्यंत पोहचते, येथे गंधदेखील अधिक दूरीपर्यंत पोहचू पावत नाही. कोवाक्स यांनी सांगितले की व्हेल आपला हेतू मांडण्यासाठी गाणी गातात. या दरम्यान ते सहवासासाठी तयार असल्याचे संकेत देतात. सामान्यतः नर व्हेल गाणे गाते. ते दुसर्‍या नरला सांगू इच्छित असतात की "मी मोठा आहे, ताकतवान आणि प्रेरित, आणि मादाला सांगतो, मी मोठा आहे, मजबूत आणि अत्यधिक प्रेरित."
 
बायोलॉजी लेटर्समध्ये लपलेल्या रिसर्चच्या परिणामस्वरुप याची पुष्टी केली गेली आहे की बोहेड शरद ऋतूतील शेवटच्या दिवसांपासून वसंत ऋतुच्या सुरुवाती दिवसांपर्यत नियमित रुपाने गीत गातात.
 
स्टैफोर्डप्रमाणे, "गाणी एका वर्षात आणि वेगवेगळ्या वर्षात बदलून जातात आणि का हे आम्हाला माहीत नाही? हे एक रहस्य आहे राहणार कारण तो आर्कटिकमध्ये जोरदार हिमवर्षावाच्या खाली राहूनदेखील गातात, अशा परिस्थितीत माणासांसाठी तेथे पोहचून त्यांना बघणे आणि त्यांच्यावर शोध करणे अतिशय कठीण आहे.