मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (09:51 IST)

जन्म तुमचा झाला बाळांनो,पालक झालो...

World Parents' Day
जन्म तुमचा झाला बाळांनो,पालक झालो,
एका मोठ्या जवाबदारी त अडकले गेलो,
फार मोठ आहे हे शिवधनुष्य पेलणं,
कठीण आहे देवा, यशस्वी पालक होऊन जगणं!
कित्ती गोष्टींचा केला त्याग ह्यासाठी,
कित्ती अंगीकारल्या, ह्या हट्टा पोटी,
आणली स्वतः वर बंधने अगणितच,
करायचं म्हटलं तर, घेतलं एकदम मनावरचं,
पण समाधान अंती वाटतेच आहे मज,
पावलावर जेव्हा पावलं पडतंय, अगदी सहज,
आपल्या वडिलांनी दिलेली आहुती आत्ता लक्षात येते,
आपण माय-बाप झाल्या वरच मंडळी सर्व लक्षात येते!
.....अश्विनी थत्ते.