सोमवार, 8 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (10:04 IST)

IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइल ने नॉन-एग्जीक्यूटिव पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले

IOCL Recruitment 2020
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने नॉन-एग्जीक्यूटिव पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या भरती प्रक्रियेत IOCL एकूण 47 रिक्त पदांवर भरती करणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेत स्थळावर iocl.com 15 जानेवारी, 2021 च्या पूर्वी अर्ज करू शकतात. उमेदवारांना सल्ला देण्यात येत आहे की अर्ज करण्यापूर्वी विभागाने दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन अधिसूचना वाचावी. जेणे करून अर्जामध्ये काहीही त्रुटी आढळल्यास अर्ज नाकारले जाऊ शकतात.
 
इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडने काढलेल्या या रिक्त जागांचा भाग होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही विषयात अभियांत्रिकी चे तीन वर्षाचे डिप्लोमा असणे आवश्यक आहे.याच सह अर्जदारांचे वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी आणि 26 वर्षापेक्षा अधिक नसावी. आरक्षित वर्गाचे उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत देण्यात येईल.
 
विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नॉन-एग्जीक्यूटिव पदांसाठी अर्ज करणारे सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना फी म्हणून 100 रुपये द्यावे लागणार. या शिवाय,एसटी, एससी आणि पीडब्ल्यू बीडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अर्ज फी द्यावी लागणार नाही. अर्ज फी केवळ ऑनलाईन मोडद्वारे स्वीकारली जाईल. लक्षात ठेवा की फी भरण्याचे इतर कोणतेही मार्ग स्वीकार केले जाणार नाही.
 
नॉन-एग्जीक्यूटिव पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांना लेखी परीक्षा, कौशल्य आणि शारीरिक चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या शिवाय अंतिम यादी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांच्या गुणवत्तेच्या आधारे तयार केली जाईल. लेखी परीक्षा 14 फेब्रुवारी 2021 आणि कौशल्य चाचणी परीक्षा 15 फेब्रुवारी घेण्यात येईल. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. प्रश्न पत्रिका 100 गुणांची असेल, या मध्ये 100 प्रश्न असतील. प्रत्येकी प्रश्न 1 गुणांचा असेल.
 
ही भरती उडीसा, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तरप्रदेश, आसाम, आणि राजस्थानसाठी आहे.
 
अधिकृत संकेतस्थळ -
https://iocl.com/ वर क्लिक करा.
 
अधिकृत माहितीसाठी येथे https://iocl.com/download/Recruitment_of_Non_executives_in_Pipelines_Division.pdf क्लिक करा.