शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (14:16 IST)

10 वी उत्तीर्ण उमेदवारांना RBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी

10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 241 जागांसाठी भरती केली जाणार आहे. RBI मध्ये सिक्युरिटी गार्ड या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
 
www.rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसंच अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2021 आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी शुल्क भरावं लागणार आहे.
 
18 ते 25 या वयोगटातील उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. तसंच ओबीसी वर्गासाठी तीन वर्षांची तर एससी, एसटी वर्गासाठी पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे. 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. तसंच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार नाही. अर्ज करणारा उमेदवाराचं 1 जानेवारी 2021 पर्यंत पदवीपेक्षा कमी शिक्षण असणं आवश्यक आहे.
 
देशातील 18 शहरांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 241 पैकी 32 जागा या एससी, 33 जागा एसटी आणि 45 जागा ओबीसी वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त ईडब्ल्यूएससाठी 18 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 113 जागा असतील.
 
ऑनलाइन पद्धतीनं परिक्षेनंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.