रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (18:31 IST)

'अशी' होणार पोलीस भरतीसाठीची परीक्षा, फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल

यंदाच्या पोलीस भरतीसाठी फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर लेखी परीक्षेचे नियम आहे तसेच राहणार आहेत. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे लेखी परीक्षेचे विषय आहेत. लेखी परीक्षेत खुल्या गटाला किमान 35 टक्के, राखीव गटासाठी 33 टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे. त्यानंतर तुम्ही मैदानी चाचणी देऊ शकणार आहात.
 
मैदानी चाचणीसाठी असलेल्या प्रकारांमध्येही आता बदल करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार आता पुरुषांसाठी लांबउडी, पुलअप्स वगळून केवळ तीन आणि महिलांसाठीही लांब उडी वगळून तीनच प्रकार ठेवण्यात आले आहेत.
 
पुरुषांसाठी – एकूण गुण 50
1600 मीटर धावणे – 30 गुण
100 मीटर धावणे – 10 गुण
गोळाफेक – 10 गुण
महिलांसाठी – एकूण गुण 50
800 मीटर धावणे – 30 गुण
100 मीटर धावणे – 10 गुण
गोळाफेक – 10 गुण