सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

परतली पॅरललची फॅशन

पेहरावातला थोडासा ट्रेंड लक्षात घेतला तर फॅशनशी हात मिळवणं सहज शक्य आहे. सलवार-कुडता हा अगदी सामान्य पेहराव. पण त्यातही कितीतरी आकर्षकता आणता येते. सध्या लांब कुडत्यावर पॅरललची फॅशन आहे. 'दुनियादारी'पासून ही फॅशन परतलीय. कॉलेजगोइंग मुलींबरोबर मुलांसाठीही पॅरलल हटके लूक देते. पार्टी असो किंवा सहल कुठेही पॅरलल शोभून दिसते. पार्टीसाठी पॅरललवर एम्ब्रॉयडरी किंवा लटकन असणारा कुडता लक्षवेधी ठरेल.

मरूम आणि क्रीम रंगाची रंगसंगती आकर्षक दिसते. यामुळे पारंपरिक लूकही मिळतो. कुंदनयुक्त कलाकुसर पारंपरिकतेबरोबरच स्मार्ट लूक देऊ शकते. रोजच्या वापरासाठी लेस असलेला पॅरलल आणि कुडता जास्त छान दिसतो. या ड्रेसवर तुमच्या आवडीनुसार ओढणी घेतली किंवा नाही घेतली तरी चालते. अशा प्रकारे ही जुनी फॅशनही तुमच्या स्टाईलनुसार वेगळाच प्रभाव टाकण्यास पुरेशी आहे.