मंगळवार, 9 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (09:30 IST)

फॅशन टिप्स : कपड्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

fashion easy hacks to keep clothes like new hew to take care of clothes easy tips in marathi webdunia marathi kapdyanchi kalji kshi ghyaal
कपड्यांची योग्य काळजी घेतल्यानंतर देखील ते जुनाट दिसू लागतात हे हॅक्स वापरून कपड्यांना नवीन सारखे ठेवा.  
* कपड्यांना फिकट होण्यापासून वाचवा-
आपली इच्छा असल्यास कपड्यांना फिकट आणि पुसट होण्यापासून वाचण्यासाठी पाण्यात मीठ किंवा व्हिनेगर घोळ त्यात काही वेळ कपडे भिजत ठेवा असं केल्याने कपड्यात चमक येईल. कपड्यांना उन्हात वाळत घालू नका. कपडे नेहमी हँगर वर सावलीत वाळत घाला. असं केल्याने कपड्यांचा रंग उडणार नाही.  
 
* हेयर स्ट्रेटनर ने शर्टच्या कॉलर ला सरळ करा- 
कॉटनच्या शर्टाला सरळ ठेवले नाही तर त्याचे कॉलर दुमडून जातात. आयर्न केल्यावर देखील व्यवस्थित होत नाही. अशा परिस्थितीत शर्टचे संपूर्ण लूक खराब होते. शर्टच्या खराब कॉलरला आपण हेयर स्ट्रेटनर ने ठीक करू शकता. या मुळे शर्टाची कॉलर नवी सारखी दिसेल  
 
* सूती कपड्यांना आक्रसू देऊ नका- 
सूती कपड्यांना प्रथम धुतल्यावर ते आक्रसतात आणि त्यांची फिटिंग खराब होते असं होऊ देऊ नका. कपड्यांना डिटर्जंट मध्ये धुण्या ऐवजी बेबी शँपूने धुवा. असं केल्याने ते आक्रसणार नाही. आणि त्याचे रंग देखील पुसट आणि फिकट होणार नाही. आपण एखादा सूती ड्रेस शिवून घेत असाल तर टेलर ला देण्याच्या पूर्वी त्या कपड्याला घरीच धुऊन घ्या नंतर शिवायला द्या. असं केल्याने कपड्याला जेवढे आक्रसायचे असेल कापड श्रींक होईल.  
 
* रेझरने पिलिंग करा-
काही कपड्याचे सूत असे असतात की एक दोन वेळा वापरल्या नंतरच जुनाट वाटतात. त्या मुळे त्यांचा लूक खराब होऊ लागतो. घर्षणामुळे त्यांचे तंतू तुटू लागतात. त्यावर बारीक लिंट (lint) येऊ लागतात हे लिंट (lint) काढण्यासाठी रेझर चा वापर करा. लिंट(lint)निघून जातात.  
 
* कपड्यावरील सुरकुत्या या प्रकारे काढा-
सूती आणि सिल्क च्या कपड्यासह ही सर्वात मोठी समस्या आहे की त्या मध्ये लवकर सुरकुत्या पडतात. त्यामुळे कपडे जुनाट वाटतात. या साठी कपड्यांना हँगर वर लावून स्प्रे बॉटल च्या मदतीने सुरकुत्या पडल्या आहे त्या जागी स्प्रे करा आणि हेयर ड्रायर वापरून त्यांना काढून टाका.