शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (19:54 IST)

पुरुषांची विंटर फॅशन : ट्रेंडी विंटर जॅकेट्‍स

Men's Winter Fashion: Trendy Winter Jackets
डेनिम जॅकेट कोणत्याही पेहरावावर उठून दिसतं. कॅज्युअल जीन्स किंवा चिनोजवर ही हे जॅकेट चालून जाईल. डॅशिंग लूकसाठी तुमच्या बॉर्डरॉबमध्ये डेनिम जॅकेट असाय लाच हवं. ब्लॅक स्वेटर किंवा व्हाईट शर्टसोबतही हे जॅकेट कॅरी करता येईल. हटके स्याईलचं डेनिम जॅकेट निवडा आणि जबरदस्त लूक मिळवा. 
 
काही तरी  वेगळं ट्राय करायचं असेल तर पारका जॅकेट घेता  येईल. थंडीत भटकंतीला जात असाल तर हे जॅकेट मस्ट! जाडसर कापडाचं आणि फरचं हुडी असलेलं हे जॅकेट तुमचालूक जास्त स्टायलिश बनवतं. 
 
क्विल्टेड जॅकेट्‍सही सध्या जोरात आहेत. एखाद्या ब्लँकेटप्रमाणेच या जॅकेटची ऊब असते. त्यामुळे थंडी वाढली तरी टेन्शन लेने का नाही. हे जॅकेट घालून तुम्ही थंडीचा अगदी बिनधास्त सामना करू शकता. 
फ्लाईट जॅकेटचा ट्रेंड एव्हरग्रीन आहे. हा पॅटर्न कधीही जुना होत नाही. या जॅकेटमुळे मिल्ट्री लूक मिळतो. रफ अँड टफ कापडामुळे तुम्ही हे जॅकेट हवं तसं वापरू शकता. मुख्य म्हणजे हे जॅकेट वजनाला फारच हलकं असतं. 
 
क्लासिक लूक मिळवण्यासाठी वेरसिटी जॅकेट घ्यायला हवं. हा ट्रेंडही सध्या चांगलाच इन आहे. या जॅकेटचा लूक बायकर्ससारखा असला तरी यामुळे स्वेट शर्ट घातल्यासारखं वाटेल. डेनिम आणि स्नीकर्ससोबत तुम्ही हे जॅकेट पेअर करू शकता.