गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

बॅकलेस ब्लाऊज इन फॅशन

सध्या बॅकलेस ब्लाऊजची फॅशन आहे. तरुण मुली तर यासाठी क्रेझी झाल्या आहेत असे ही म्हणू शकता. अलीकडे पार पडलेल्या बहुसंख्य फॅशन शोजमध्ये विविध डिझायनर्सनी बॅकलेस ब्लाऊजची वैविध्यपूर्ण डिझाइन्स सादर करून आगामी उत्सवपर्वातील हा ट्रेंड दाखवून दिला आहे.


 
एखादं वेळी साडी प्लॅन किंवा साधी हलक्या प्रिंटची असली तरी त्यावर स्टायलिश लुक देणारे बॅकलेस ब्लाऊजचा पर्याय आहेत. नेट, जॉजेर्ट आणि शिफॉनच्या साड्यांवर हे शोभून दिसतात. पार्टी विअर हवी असल्यास त्यावर एम्ब्रॉयडरी, जदोर्सी किंवा लेस वर्क शोभून दिसेल. साडीचे ब्लाऊज पीस असल्यावरही त्यात मॅचिंगचा वेगळा कापड लावून ते ब्लाऊज ग्लॅमर्स लुक ‍देतात.

बॉर्डरवर लेस आणि डोरी लावून ते आणखी आकर्षक केले जाऊ शकतात. असे ब्लाऊज शिवण्यासाठी नेट किंवा सिल्क मेटेरिअल जास्त योग्य ठरेल.


 
आणि शेवटलं पण सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला हा ट्रेंड फॉलो करायचा असेल तर पाठीच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. हे ब्लाऊज वापरण्यापूर्वी बॅक वॅक्सिंग आणि ब्लिच करणे महत्त्वाचे आहे. पाठीचा रंग उजळ दिसण्यासाठी कॉम्पॅक्टचा वापर ही करू शकता.