शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : शनिवार, 11 मार्च 2023 (10:06 IST)

श्री माधवनाथ महाराज पुण्यतिथी (अमृत महोत्सव) चित्रकूट

इंदूर मध्ये प्रसिद्ध श्रीनाथ मंदिर दक्षिण तुकोगंज येथे श्री योगाभ्यानंद महाराज संस्थान चित्रकूट यांच्या पुण्यतिथी निमित्त अमृत महोत्सव साजरा केला जातो. हा  फाल्गुन पौर्णिमेपासून नाथ षष्ठी पर्यंत हा सण पारंपरिक रीत्या साजरा केला जातो. ह्या उत्सवाला काही वेगळेच रंग दिसून येतो. 
 
13 मार्च 1936 रोजी श्रीनाथजींचे पार्थिव महाराष्ट्रातील हिंगणघाट येथे विसर्जित केले गेले पण त्यांच्या सांगण्यानुसार श्रीनाथ मंदिराच्या तळघरात त्यांनी स्वतःने हात  ठेवून सांगितले की माझा शेवटचा दगड येथेच राहील. त्यांच्या या विधानांनुसार महाराजांच्या भक्तांनी त्यांच्या पार्थिव देहाला हिंगणघाट येथून इंदूर आणण्याचा निर्णय  घेतला. त्यांच्या नागपुरातील भक्त देशमुख यांनी महाराजांच्या पार्थिवाला आपल्या गाडीतून आणण्याची तयारी केली. गाडीचे चाक पंक्चर होते. रात्रीची सर्व दुकाने बंद  होती. भाविकांनी हार न मानता श्रींच्या नावाने गाडी सुरू केली. गाडी इंदूर पर्यंत कोणतेही व्यत्यय न आणता चालत राहिली. पार्थिवाला घेऊन गाडीत सात जण आले.  उर्वरित भाविक लोक राज्य परिवहनच्या बस मधून आले. 
 
महाराजांच्या शेवटच्या दर्शनासाठी इंदूरचे नाथ मंदिर भाविकांनी भरलेले होते. काही जण खेडीघाट येथे थांबले होते. रात्री पार्थिवाला घेऊन भाविक इंदूरला आले.  त्यानंतर समाधी किंवा अंत्यसंस्कार या वरून भाविकांमध्ये वाद सुरू झाला. 
 
दोघांच्या संमतीने अंत्यसंस्काराचे ठरले. पण राज्यकर्त्यांच्या परवानगी शिवाय हे शक्य नव्हते. याचे कारण की नाथ मंदिर शहराच्या मध्यभागी होते. त्या काळात  होळकरांकडे कारभाराची सूत्रे होती. पण त्यावेळी तुकोजीराव परदेशी गेले होते. अशावेळी त्यांच्या सेक्रेटरीच्या आदेशानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वाजता अंत्यसंस्कार  करण्याचे ठरले. 
 
तिसऱ्या दिवशी हाडाची साठवण करून श्रींची हाडे रसायनांनी भरलेल्या काचेच्या मोठ्या पात्रात ठेवून मंदिराच्या तळघरात खड्डा खणून त्यात पुरल्या. श्रीनाथांच्या  पायाचे माप घेऊन संगमरवरीचे पावलं बनवून ठेवण्यात आली. त्या दिवसापासून आजतायगत त्या पुण्य वास्तूमध्ये योगाभ्यानंद श्री माधव महाराजांचे अस्तित्व ज्वलंत  आहे. 
 
महाराज आपल्या भाविकांचे संकटापासून रक्षण करतात, मुक्ती देतात. श्रीनाथजींनी हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत आणि पूर्वेकडून ते पश्चिमेकडे जनजागृतीचा झेंडा  फडकावाला आहे. श्रीनाथ यांचे शिष्य भक्तगण मुंबई, पुणे, नाशिक, मद्रास येथे पसरलेले आहे.