1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By
Last Updated : बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (12:14 IST)

कोजागरी ‍पौर्णिमा 2020 : शरदाच्या चांदण्यात करण्यायोग्य 8 काम

Sharad Purnima 2020
शरद पौर्णिमेचा चंद्र आणि चांदणे विशेष गुणकारी असून यातून येणारा प्रकाश औषधी असल्याचे म्हटलं जातं. या वेळेचा फायदा घ्यावा. शरद पौर्णिमेला या 8 पैकी एक काम जरी केले तरी फायदा निश्चित होईल.
 
1. नेत्र ज्योती वाढविण्यासाठी रात्री 15 ते 20 मिनिटे चंद्राकडे त्राटक बघावे.
 
2. शिथिल इंद्रिये पुष्ट करण्यासाठी चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवली पाहिजे.
 
3. चंद्र देव, लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवून वैद्यराज अश्विनी कुमारांना प्रार्थना करावी की आमच्या इंद्रियांची तीव्रता आणि तेज वाढावं. नंतर खीरीचे सेवन करावे.
 
4. शरद पौर्णिमा दम्याच्या रुग्णांसाठी वरदान देणारी रात्र आहे. रात्री झोपू नये. रात्री चंद्र प्रकाशात ठेवलेल्या खीरीचे सेवन केल्याने आजरा बरा होतो.
 
5. पौर्णिमा आणि आमवस्येला चंद्राच्या विशेष प्रभावाने समुद्रात भरती येते. जेव्हा चंद्र इतक्या विशाल समुद्रात उलथापालथ करत त्याला थरथरण्यासाठी भाग पाडू शकतो तर विचार करा आमच्या शरीरातील जलीय अंश, सप्तधातु, सप्त रंग, यांच्यावर चंद्राचा किती प्रभाव पडत असेल. म्हणून या रात्री कोणत्याही एक मंत्राचे पूर्ण मन लावून ध्यान करावे. 100 टक्के मनोकामाना पूर्ण होईल.
 
6. या रात्री पांढर्‍या आसनावर बसून चांदीच्या ताटात मकाने, खीर, तांदूळ आणि पांढर्‍या फुलाचा चंद्रदेवाला नैवेद्य दाखवावा.
 
7. शरद पौर्णिमेला पूजा, मंत्र, भक्ती, उपास, व्रत इतर केल्याने शरीर तंदुरुस्त, मन प्रसन्न आणि बुद्धी आलोकित होते.
 
8. या रात्री सूईत दोरा ओवण्याचा अभ्यास केल्याने नेत्र ज्योती वाढते.