मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (11:22 IST)

हायवे : चित्रपट परीक्षण

‘हायवे’ हा मराठी सिनेमा सिल्वर स्क्रीनवर झळकलाय. या सिनेमाविषयी अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. या सिनेमात गिरीश कुलकर्णी, मुक्ता बर्वे, रेणुका शहाणे, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, सुनील बर्वे अशी कलाकारांची भली मोठी फौज या सिनेमात पाहायला मिळतेय. हायवे या सिनेमात जवळ जवळ 40 पात्रं आहेत. यातले प्रत्येक कॅरेक्टर एक प्रवासी आहे, प्रत्येकाचं एक बॅगेज आहे. प्रत्येकाची एक गोष्ट आहे आणि प्रत्येक जण कसल्यातरी शोधात आहे. या सिनेमाची ब्यूटी म्हणजे संपूर्ण सिनेमा हा गाडीत चित्रित करण्यात आलाय.

सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत हायवेवरच शूट करण्यात आलाय. त्यामुळे हायवेच्या निमित्तानं काही नवीन एक्सपेरीमेन्ट्स मराठी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतात. या सिनेमातली कथा ही शब्दात सांगणं खूपच कठीण आहे. कारण ‘कथा’ या गोष्टीचं एक वेगळं डेफिनेशन गिरीश कुलकर्णीनं यात मांडलंय. यात एक एनआरआय तरुण आहे जो आपल्या आजारी वडिलांना शेवटचं भेटायला अमेरिकेहून मुंबईला आलाय. तर एकीकडे एक तमाशात काम करणारी बाई आहे जी आपला प्रवास गाठतेय. एक अत्यंत साधी गृहिणी आपल्या नवर्‍यासोबत प्रवास करतेय तर दुसरीकडे एक अत्यंत श्रीमंत घरातली हाय प्रोफाइल स्त्री एका वेगळ्याच कामासाठी प्रवास करतेय. या सिनेमात असे अनेक प्रवासी आहेत जे आपआपलं बॅगेज घेऊन प्रवास करताना दिसतात. अभिनेता गिरीश कुलकर्णीनं या सिनेमाची कथा लिहिली असून अत्यंत वेगळ्या पद्धतीनं खरंतर ‘कथा’ या सिनेमातल्या अतिशय महत्त्वाच्या एलिमेंटचं डेफिनेशन जरा वेगळ्या पद्धतीनं या सिनेमात मांडलंय. ‘हायवे’ या सिनेमात अनेक एक्सपेरीमेन्ट्स करण्यात आलेत. ज्याचं क्रेडिट खरंतर दिग्दर्शक उमेश कुलकर्णीला द्यायलाच हवं. सिनेमाची मांडणी, कथेची हाताळणी या सगळ्या गोष्टी छान झाल्यात. रेणुका शहाणे, मुक्ता बर्वे, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, टिस्का चोप्रा, सुनील बर्वे, हुमा कुरेशी या नटांनी सुरेख अभिनय केलाय.