या प्रकारे रागावर नियंत्रण ठेवा
राग कंट्रोल करण्यासाठी हे करुन बघा
जेव्हा ही आपल्याला राग येत असेल तर 10 पर्यंत उलय मोजणी करा. याने मेंदू डिस्ट्रेक होईल आणि आपल्याला रागावर नियंत्रण ठेवता येईल.
राग अधिक येत असेल तर त्या जागेवरुन सरकून जा आणि पायर्या चढायला सुरुवात करा. चालण्याने किंवा पायर्या चढ-उतर केल्याने रागावर नियंत्रण राहतं.
राग कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करा. आपण वॉक किंवा एक्सरसाइज कराल तर रागावर नियंत्रर राहील. आपण स्विमिंग करुन देखील रागावर ताबा ठेवू शकता.
रागावर नियंत्रणासाठी खोल श्वास घ्या. आपला जुना फोटो बघा किंवा एखादा नैसर्गिक फोटो किंवा जागा बघा याने रागावर नियंत्रण होईल.
आपण जे बोलत आहात त्यावर लक्ष क्रेंद्रित करा. आपण विचारपूर्वक बोलाल तर आपल्यालाही राग येणार नाही आणि समोरच्याला देखील राग येण्याची पाळी येणार नाही.
झोप पूर्ण घ्या. झोपेची कमी असल्यास चिडचिड होऊ लागते आणि अधिक राग येतो.