शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

येथे आइस्क्रीम कोनमध्ये मिळते कॉफी

जपानचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ फक्त सीफूड म्हणजे मासे, खेकडे व झिंग्यांपर्यंत मर्यादित नाही. या देशाची आणखी एक तोंडाला पाणी आणणारी लज्जतदार वस्तू आहे ती म्हणजे कॉफी. आणि विशेष म्हणजे आइस्क्रीम कोनमध्ये तुम्ही ती प्राप्त करू शकता.
 
आतापर्यंत तुम्ही कॉफीचा स्वाद फक्त कपामध्ये घेतला असेल. मात्र जपानमधील लोक आइस्क्रीम कॉफी पिण्याचा आनंद घेतात. इंस्टाग्रामवर सध्या या कॉफी आइस्क्रीम कोनची प्रचंड चर्चा आहे. इंस्टाग्राम सर्चवर तुम्हाल काही असेच पॅकेज मिळतील जे पर्ययाच्या रूपात हा चवदारपणा ऑफर करतात. मात्र जपानच्या काही फुडीजने तर यास आपल उद्योग बनविले आहे.
 
टोकियोतील एक कॅफे कॉफी कोन फक्त कोन्समधूनच कॉफी देत नाही तर प्रत्येक पेयपदार्थांसोबत काही अशाच कलासुद्धश सादर करतो. म्हणजे तुम्ही हे पेय पिण्यास बसाल तेव्हा फोटो काढण्याचा मोह आवरू शकणार नाही. भलेही हा कोन एखाद्या नेहमीच्या आइस्क्रीम कोनसारखा वाटत असला तरी त्या कॉफी पिण्यायोग्य बनविण्यासाठी आतून डार्क चॉकलेटचे कोटिंग केले जाते. हे कोटिंग वितळण्याआधी पिणार्‍याला दहा मिनिटे कॉफीची चव देते.