1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (09:50 IST)

अमावस्येला हे 5 नियम पाळा

Amavasya upay
अमावस्या किंवा अवस महिन्यातून एकच येते. म्हणजे वर्षभरातून 12 अमावस्या असतात. प्रामुख्याने अमावस्या सोमवती अमावस्या, भोमवती अमावस्या, मौनी अमावस्या, शनी अमावस्या, हरियाली अमावस्या, दिवाळी अमावस्या, सर्वपितृ अमावस्या असतात.
 
* अवसेला भुतं-प्रेत, पितृ, पिशाच्च, निशाचर प्राणी आणि दैत्य किंवा राक्षस अधिक सक्रिय आणि मुक्त असतात. म्हणून या दिवसाला लक्षात घेउन विशेष काळजी घ्यावी.
 
* अमावस्या मध्ये आसुरी आत्मा अधिक सक्रिय राहतात, त्याचा परिणाम माणसांवर देखील होतो. माणसाचा स्वभाव देखील राक्षसी होतो. म्हणून त्या दिवशी माणसाचे मन आणि मेंदू धार्मिक प्रवृत्ती कडे वळवतात. जर कोणी धर्माच्या नियमांचं पालन करत नसेल तर त्याला त्रास सहन करावा लागतो. 
 
1 या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तामसी आहाराचं सेवन करू नये.
 
2 या दिवशी मद्यपाना पासून दूर राहावं. यामुळे आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या भविष्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो.
 
3 या दिवशी माणसांमध्ये नकारात्मक विचारसरणी वाढते. अश्या परिस्थितीत नकारात्मक परिस्थिती माणसांवर आपला प्रभाव पाडते. त्यामुळे त्यांनी सतत मारुतीचा जप करावा.
 
4 या दिवशी जे लोक अति भावनिक असतात त्यांचा वर जास्त परिणाम होतो. म्हणून अश्या लोकांनी आपल्या मनावर ताबा ठेवावा आणि पूजा जप-तप ध्यान करावे.
 
5 शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा. जाणकार लोक असे म्हणतात की चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या 3 दिवसात पवित्र राहावं.