गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या 5 लहान चुका आणि ग्रह देतात अशुभ प्रभाव

अनेक लोकांचे ग्रह अशुभ नसतात परंतू त्यांच्या काही सवयींमुळे अशुभ प्रभाव वाढत असतो. जसे काही लोक पाणी वाया घालवतात ज्याने चंद्र दोष वाढतो. यामुळे घरातील स्त्रियांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. घरात नकारात्मकता वाढते आणि ताण वाढतो. तसेच काही लोकं उष्टं सोडून देतात. याने मंगळ आणि शुक्र दोघांचा अशुभ प्रभाव वाढतो. घरात वाद निर्माण होतं. म्हणून काही सवयी बदल्या तर अशुभ प्रभावापासून वाचता येईल.
 
बसल्या बसल्या पाय हालवणे
अनेक लोकांना बसल्या बसल्या पाय हालवण्याची सवय असते. असे केल्याने बुध आणि शनी दोन्ही अशुभ फल देतात. यावर समाधान रूपात शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी चढवावे आणि बुधवारी गायीला मूग खाऊ घालावे.
 
पूर्ण शरीर हालवत राहणे
अनेक लोक सरळ उभे राहू शकत नाही. उभ्या उभ्या किंवा बसले असले यांचे शरीर हालवण्याची सवय नुकसानदायक ठरते. याने स्मरण शक्ती कमजोर होते. या सवयीमुळे गुरु आणि बुध दोन्ही अशुभ प्रभाव देतात. या पासून वाचण्यासाठी गणपती मंदिरात मुगाचे लाडू किंवा तांब्याची भांडी अर्पित करायला हवी.
 
सतत खाजवणे
खाज एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक लोकांना सवय लागते. शरीराच्या कोणत्याही भागाला सामान्यापेक्षा अधिक खाजवत राहिल्याने केतूचा अशुभ प्रभाव वाढतो. यापासून सुटकारा मिळवण्यासाठी सकाळ-संध्याकाळ काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालावी.
 
सतत खाणे
सतत काही-काही तोंडात टाकत राहण्याची सवय योग्य नाही. असे केल्याने सूर्य दोष वाढतं असून अशुभ प्रभाव पडतो. याने आधिकार्‍यांशी संबंधित किंवा प्राशासनिक कामांमध्ये बाधा उत्पन्न होते. सूर्याच्या अशुभ प्रभावामुळे इतर लोकांशी वाद निर्माण होतात. यापासून वाचण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्यायला हवे.
 
वायफळ बडबड आणि उगाच सल्ला देणे
न मागता सल्ला देण्याची सवय अनेक लोकांना असते. अश्या सवयीमुळे दुसर्‍यांना त्रास होता सल्ला देणाराही परेशान राहतो. बृहस्पतीच्या अशुभ प्रभावामुळे असं घडतं. यापासून वाचण्यासाठी आपली सल्ला देण्याची किंवा वायफळ बडबड करण्याची सवय सोडावी आणि एखाद्या मंदिरात जाऊन हळद, चंदन किंवा केशर दान करावे.