शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

आपण दुसर्‍यांच्या वस्तू मागून वापरत असाल तर हे वाचल्यावर असं मुळीच करणार नाही

आपल्याला दुसर्‍यांच्या वस्तू मागून वापरण्याची सवय असेल तर ही सवय लगेच बदलायला हवी. ही सवय आपल्यासाठी अडचण आणि दुर्भाग्य घेऊन येईल. खरं म्हणजे या मागील कारण आहे नकारात्मक ऊर्जा. 
 
दुसर्‍यांच्या काही वस्तू अशा अशात ज्या वापरल्याने नकारात्मकता आपल्यापर्यंत पोहचते म्हणून काही वस्तू अश्या आहेत ज्या वापरणे लगेच बंद कराव्या.
 
घड्याळ
कधीही दुसर्‍याची घड्याळ घालू नये. घड्याळाला व्यक्तीच्या जीवनाशी निगडित वेळ याहून जोडले गेले आहे, अशात दुसर्‍याची घड्याळ घातल्याने त्याच्या वाईट काळ आपल्याशी जुळू शकतो आणि या नकारात्मकतेमुळे आपल्याला अपयश हाती लागू शकतो.
 
अंगठी
दुसार्‍याची केवळ रत्न जडित नव्हे तर कोणत्याही धातूने निर्मित अंगठी घालणे आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. बोटांच्या अंगठी घालत असलेल्या जागेशी आमच्या जीवन आणि आरोग्य जुळलेलं असतं म्हणून असे मुळीच करू नये.
 
कपडे
कोणाचाही घातलेले कपडे वापरल्याने दुर्भाग्य येतं. म्हणून इतर कोणाचेही कपडे वापरू नये. याने नकारात्मक ऊर्जा देखील शरीरात प्रवेश करते.  आरोग्याच्या दृष्ट्या देखील हे चुकीचे आहे कारण यामुळे कीटाणु प्रवेश करतात आणि त्वचा संक्रमण होऊ शकतं.
 
चप्पल
अनेकदा घाईघाईत आम्ही कुणाचाही चप्पल घालून जवळपास फिरायला निघून जातो परंतू असे करणे दारिद्र्याचे लक्षण आहे. खरं तर शनीचे स्थान पायात असल्यामुळे सर्व संघर्ष पायाच्या भागाला झेलावे लागतात. अशात दुसर्‍याची चप्पल घालणे म्हणजे त्यांचे संघर्ष स्वतः:वर ओढवून घेण्यासारखे आहे.
 
कंगवा
केवळ आरोग्य नव्हे तर भाग्याच्या दृष्टीने देखील दुसर्‍याचा कंगवा वापरणे चुकीचे आहे. कंगवा तसेच डोक्याशी जुळलेली कुठलीही सामुग्री शेअर करू नये. याने आपल्या भाग्यावर विपरित परिणाम होतो.
 
पेन
कोणाची पेन किंवा पेसिंल घेऊन वापरल्यावर लगेच परत देणे योग्य आहे. असे केले नाही तर आर्थिक आणि करिअर क्षेत्रात देखील भारी नुकसान झेलावं लागू शकतं.
 
इतर
आपल्याला मिळालेली भेटवस्तू इतर कुणाला देऊ नये. स्वतः: वापरणे अधिक योग्य ठरेल.
आपल्यासाठी अत्यंत लकी वस्तू कधीही कुणाला देऊ नये. याने आपलं गुड लक दुसर्‍याकडे जाईल.
दुसर्‍यांच्या बिछान्यावर झोपणे देखील दोषकारक आहे. असे केल्याने आर्थिक समस्या आणि दुर्भाग्य येतं.