शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (09:58 IST)

आपण मांगलिक आहात, मग हे उपाय करा मंगळ दोष दूर होणार

मंगळाची ओळख : मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ मकर मध्ये उंचीचा आणि कर्क मध्ये खालचा मानला गेला आहे. सूर्य आणि बुध मिळून मंगळ चांगला बनतो, सूर्य आणि शनी मिळून मंगळ खराब करतात. मंगळ गुरु मित्रासह बलवान बनतात. राशीत प्रथम भावात आहे आणि बुध आणि केतू हे शत्रू आहेत. शुक्र, शनी आणि राहू सम आहेत. मंगळा सह शनी म्हणजे राहू. चांगला मंगळ हनुमानजी आणि खराब किंवा बद मंगळ वीरभद्र किंवा 'जिन' सारखे असतात.
 
मांगलिक दोष : एखाद्या माणसाच्या जन्मकुंडलीत मंगळ लग्न, चवथ्या, सातव्या, आठव्या आणि द्वादश भावामधून कोणत्याही एका भावात असल्यास हे 'मांगलिक दोष' असे म्हणतात. काही विद्वान या दोषाला तिन्ही लग्न म्हणजे लग्नाच्या व्यतिरिक्त चंद्र लग्न, सूर्य लग्न, आणि शुक्राच्या दृष्टीने बघतात. या मान्यतेनुसार 'मांगलिक दोष' च्या जातकाची पूजा करणं आणि मांगलिक दोष असलेल्या मुलगा किंवा मुलीचे लग्न कोणा मांगलिक दोषाच्या जातकांशी करणं आवश्यक असतं. 
 
मंगळाचा दोष असणाऱ्यांनी खालील काही उपाय करावे.
1 दररोज हनुमान चालिसाचे वाचन करावे.
 
2 पांढरा सुरमा 43 दिवस पर्यंत लावावा.
 
3 कडुलिंबाच्या झाडाची पूजा करावी. 
 
4 गूळ खावे आणि खाऊ घालावे.
 
5 आपल्या रागावर मात करणं आणि चारित्र्य उत्तम राखणं.
 
6 मांसाहार आणि मद्यपानापासून लांब राहावं.
 
7 भाऊ-बहीण आणि बायकोशी चांगले संबंध ठेवा.
 
8 पोट आणि रक्त स्वच्छ ठेवा.
 
9 मंगळनाथ उज्जैन येथे भात-पूजा करावी.
 
10 लग्न झाले नसल्यास प्रथम कुंभ लग्न करावे.