संख्याशास्त्रानुसार श्रीमंत मूलांक 6

वेबदुनिया 

Widgets Magazine

मूलांक ६ हा संख्याशास्त्रानुसार सर्वाधिक श्रीमंत अंक मानला जातो. याचा स्वामी शुक्र असून, शुक्राला असुरांचा किंवा असुरी

birth 6 230
शक्तीचा गुरू मानलं जातं. एकूणच काय तर, हा श्रीमंत मूलांक तर आहेच. पण हा सर्वाधिक यशस्वी मूलांकही मानला जातो.

मूलांक ६ असणारे लोक दिसायला सुंदर व आकर्षक असतात. जर या व्यक्तींचा जन्म रविवार, सोमवार किंवा शुक्रवार या दिवशी झाला असेल तर हे लोक दिसायला गोरे असतात. एकूणच यांच्या रूपाकडे लोक स्वतहून आकर्षित होतात. मनमोहक असे यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व असल्याने यांच्या आसपास असणाऱ्या लोकांशी यांचे दृढ संबंध निर्माण होतात.

जसे की, या व्यक्ती प्रेम करतात त्या व्यक्तीचे गुलाम बनून राहतात. परंतु एकदा का संबंध तुटले की, या व्यक्ती मागे वळूनही पाहात नाहीत. यांच्या प्रेमात शुद्ध प्रेम असून वासना अधिक प्रमाणात नसते. यांच्याकडून एकूणच अनेक नवीन सूचना आणि इतर माहिती ऐकायला मोठय़ा प्रमाणात मिळते. काम आणि त्याअनुसार येणाऱ्या गोष्टींबाबत हे लोक कुठलीही टाळाटाळ करत नाहीत. संगीत आणि या कलेच्या प्रेमींना डार्क रंग अधिक आवडतात. यांचे राहणीमान हे उंची असून यांना उत्तम घर, घरातील इंटिरीअर, दागिने, घडय़ाळं आणि महागडी वस्त्रं यांचा शोक मोठय़ा प्रमाणात असतो. या सर्व गोष्टींवर यांचा खर्च मोठय़ा प्रमाणात होतो. यामुळेच क्वचित प्रसंगी यांना पैशाची कमीही भासते.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

निर्णय घेण्यास त्रास होत असेल तर धारण करा गणेश रुद्राक्ष

विघ्नहर्ता गणपती बुद्धीचा देवता आहे. बुद्धीद्वारे योग्य वेळेस निर्णय घेऊन जीवनातील मोठं ...

news

दैनिक राशीफल 03.03.2017

जवळच्या एखाद्या व्यक्तिच्या आरोग्याची काळजी राहु शकते. मनोरंजनामध्ये पैसा खर्च होईल. ...

news

लक्ष्मीच्या कृपेसाठी तीन शुक्रवारी करा हे उपाय

प्रत्येक शुक्रवारी स्नान झाल्यावर लाल किंवा पांढर्‍या रंगाचे वस्त्र धारण करावे. असे ...

news

मार्च (2017) महिन्याचे राशीभविष्य

आपले नवे घर बनू शकते. व्यापारात गती सामान्य राहील. राजनैतिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढू ...