गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 3 नोव्हेंबर 2025 (16:11 IST)

Rudraksha for Different Planets मुखांनुसार रुद्राक्ष आणि त्यांचे ग्रहांवरील परिणाम

Rudraksha for Different Planets
जीवनात काही वेळा सगळं ठीक असतानाही काहीतरी नकोसं घडतं कारण असतं ग्रहांचं असंतुलन. पण देवाधिदेव महादेवांनी दिलेलं एक अद्भुत वरदान म्हणजे रुद्राक्ष. जे फक्त एक बी नाही, तर दैवी ऊर्जा साठवून ठेवलेला जिवंत कण आहे! प्राचीन ग्रंथ सांगतात आणि विज्ञानही आज मान्य करतं की रुद्राक्षात असतात जैवचुंबकीय गुणधर्म जे मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन राखतात. पण प्रत्येक ग्रहासाठी एक विशिष्ट रुद्राक्ष असतो तर चला जाणून घेऊया कोणता रुद्राक्ष कोणत्या ग्रहाचं संतुलन साधतो-
 
एकमुखी रुद्राक्ष : सूर्याचा तेजस्वी आशिर्वाद
भगवान शिवांचा रूप आणि सूर्याचं तेज दोन्ही यामध्ये सामावलेलं आहे.
हा रुद्राक्ष एकाग्रता, आत्मविश्वास आणि आंतरिक तेज वाढवतो.
ज्यांच्या जीवनात आत्मविश्वास कमी आहे किंवा वाईट सवयींपासून मुक्त व्हायचं आहे, त्यांनी हा रुद्राक्ष धारण करावा.
पचन, श्वसन आणि ग्रंथी संबंधित विकारांवरही हे चमत्कार घडवतो.
 
द्विमुखी रुद्राक्ष : चंद्राची शांतता
भगवान शिव आणि पार्वतीच्या अर्धनारीश्वर रूपाचे प्रतीक असलेला हा रुद्राक्ष नातेसंबंधात समजूत आणि प्रेम आणतो.
कौटुंबिक तणाव कमी करून मनशांती देतो.
स्मृतीभ्रंश, हृदयविकार आणि मानसिक अस्थिरता यावरही हे रक्षण करतो.
चंद्राच्या प्रतिकूल परिणामांना तो शांतवतो — जणू मनावर चांदण्यांची थंड झुळूक सोडतो.
 
त्रिमुखी रुद्राक्ष : मंगळाची उर्जा
ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं प्रतीक.
हा रुद्राक्ष धारण केल्याने भीती, अस्वस्थता आणि आत्मसंशय नाहीसे होतात.
उर्जेची लाट निर्माण करून आत्मविश्वास वाढवतो.
मंगळाच्या त्रासामुळे होणारे अपघात, रक्तविकार आणि वादांपासून संरक्षण देतो.
 
चारमुखी रुद्राक्ष : बुधाची बुद्धिमत्ता
चार वेदांचे प्रतीक असलेला हा रुद्राक्ष ज्ञान, भाषण आणि सर्जनशीलता वाढवतो.
विद्यार्थी, शिक्षक, लेखक किंवा वक्ते यांच्यासाठी विशेष लाभदायक.
मानसिक ताण, स्मृतीभ्रंश आणि पक्षाघात यावरही उपयोगी.
 
पाचमुखी रुद्राक्ष : गुरूचा कृपाशिर्वाद
सर्वाधिक लोकप्रिय आणि पाच तत्वांचं (भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश) प्रतीक.
धारण करणाऱ्याला शांती, दीर्घायुष्य आणि आध्यात्मिक स्थैर्य प्रदान करतो.
योग, ध्यान आणि आत्मविश्वास वाढवतो, तसेच पोटाशी संबंधित विकार दूर करतो.
 
सहा मुखी रुद्राक्ष : शुक्राची सौंदर्य ऊर्जा
भगवान कार्तिकेयाशी संबंधित.
राग, मत्सर आणि मानसिक असंतुलन दूर करून सौंदर्य, आकर्षण आणि शांती वाढवतो.
शिक्षक, शास्त्रज्ञ आणि वक्ते यांच्यासाठी हे अमृतासमान.
 
सप्तमुखी रुद्राक्ष : शनिचं स्थैर्य
महालक्ष्मीचा आशीर्वाद असलेला हा रुद्राक्ष आरोग्य, संपत्ती आणि शांती आणतो.
शनीच्या नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण देतो, पोटाचे आणि हृदयाचे आजार कमी करतो.
जीवनात दीर्घकाळ टिकणारा आनंद देणारा मणी.
 
अष्टमुखी रुद्राक्ष : राहूचा संरक्षण कवच
भगवान गणेशाशी संबंधित.
हा रुद्राक्ष अडथळे दूर करून यश, समृद्धी आणि चांगले आरोग्य देतो.
विश्लेषणात्मक विचार, नेतृत्वगुण आणि कलात्मक क्षमता वाढवतो.
राहू आणि शनीच्या त्रासातून सुटका करतो.
 
नऊ मुखी रुद्राक्ष : केतू आणि देवी दुर्गेचा आशीर्वाद
नवदुर्गेच्या नऊ रूपांचं प्रतीक असलेला हा रुद्राक्ष निर्भयता आणि आत्मविश्वास देतो.
मेंदू, डोळे आणि प्रजनन संस्थेशी संबंधित विकारांपासून मुक्ती देतो.
राहू-केतूच्या दुष्प्रभावांपासून रक्षण करून जीवनात धैर्य आणतो.
 
दहामुखी रुद्राक्ष : विष्णूचा सर्वरक्षक रूप
भगवान लक्ष्मीनारायणाशी संबंधित.
काळी जादू, वाईट नजर आणि शत्रूंच्या प्रभावांपासून संरक्षण.
न्यायालयीन प्रकरणं, अपघात, भीती यावर विजय देतो.
मन:शांती आणि स्थैर्य देणारा दैवी रक्षक.
 
अकरामुखी रुद्राक्ष : हनुमंताचा अदम्य आत्मविश्वास
भगवान हनुमानाचे प्रतिक.
धारण केल्याने ऊर्जा, आत्मबल आणि कार्यक्षमतेत झपाट्याने वाढ होते.
वक्तृत्व, व्यवसाय आणि नेतृत्व क्षेत्रात यश मिळतं.
सर्व ग्रहांच्या प्रतिकूल परिणामांपासून संरक्षण मिळतं.
 
बारामुखी रुद्राक्ष : सूर्याच्या बारा किरणांचा तेजोमय दान
नेतृत्व, कीर्ती आणि आत्मविश्वास देणारा हा रुद्राक्ष तेज आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे.
डोळे, त्वचा आणि हृदयाशी संबंधित त्रास दूर करतो.
वास्तु दोष आणि नकारात्मक उर्जांपासून संरक्षण देतो.
राजकारणी आणि प्रशासकांसाठी विशेष उपयुक्त.
 
तेरामुखी रुद्राक्ष : (शुक्र) इंद्राचा दैवी वरदान
धारण केल्याने धैर्य, ज्ञान आणि आत्मविश्वास वाढतो.
आनंदी कौटुंबिक जीवन, चांगला जोडीदार आणि संतानप्राप्ती देतो.
कलाकार, वैज्ञानिक आणि राजकारण्यांसाठी हे शुभ चिन्ह आहे.
 
चौदामुखी रुद्राक्ष : (शनि) शिवाच्या तिसऱ्या डोळ्याची शक्ति
भगवान शिवाच्या नेत्रातून उत्पन्न झालेला हा सर्वात शक्तिशाली रुद्राक्ष मानला जातो.
निर्णयक्षमता, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक शक्ती वाढवतो.
शनीच्या हानिकारक प्रभावांपासून रक्षण करतो.
घरात सौख्य, व्यवसायात यश आणि मनात स्थैर्य निर्माण करतो.
 
अस्वीकारण: हा लेख सामान्य ज्योतिष आणि धार्मिक माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.