गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (12:02 IST)

7 नोव्हेंबर 2020 रोजी शनी पुष्य नक्षत्र, नवीन कार्य आणि खरेदीसाठी शुभ

दिवाळीच्या पूर्वी 7 नोव्हेंबर 2020 रोजी पुष्य नक्षत्र आहे आणि या दिवशी बही-खाता किंवा बुक किपींग खरेदी करणे शुभ असतं. शनी हे पुष्य नक्षत्राला शुभ मानले आहे. ऋग्वेदात देखील पुष्य नक्षत्र हे मंगळ करणारे मानतात. म्हणून पुष्य नक्षत्राला खरेदारी करण्यासाठी शुभ मानले आहेत. असे म्हणतात की या मुहुर्तात खरेदी केलेली कोणती ही वस्तू बऱ्याच काळासाठी उपयुक्त, शुभ आणि अक्षयी असते. चला जाणून घेऊ की या नक्षत्रामध्ये कोणते 10 खास कार्य करतात. 
 
पुष्य नक्षत्र सोमवारी आल्यास त्याला सोम पुष्य नक्षत्र, मंगळवारी आल्यास त्याला भौम पुष्य, बुधवारी आल्यास बुध पुष्य, गुरुवारी आल्यास गुरु पुष्य, शुक्रवारी आल्यास शुक्र पुष्य, शनिवारी आल्यास शनी पुष्य, रविवारी आल्यास रवि पुष्य नक्षत्र असत. या मध्ये गुरु पुष्य, शनी पुष्य, रवी पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानले गेले आहेत. प्रत्येकाचे फळ वेगवेगळे असतात. 
 
1 पुष्य नक्षत्रात सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे, कारण सोन्याला शुद्ध, पवित्र आणि अक्षय धातू मानले आहे आणि पुष्य नक्षत्रावर याची खरेदी शुभ असते. पुष्य नक्षत्रावर गुरु, शनी आणि चंद्राचा प्रभाव असतो. त्यामुळे सोनं, चांदीच्या वस्तू खरेदी करू शकतो. मान्यतेनुसार या कालावधीत केली खरेदी अक्षय राहते. अक्षय म्हणजे कधी न संपणारी.
 
2 या नक्षत्रात वाहने, घर आणि जमीन खरेदी करणे शुभ मानतात. या दिवशी मंदिराचे बांधकाम, घराचे बांधकाम इत्यादी सुरू करणे शुभ असतं. या नक्षत्रात शिल्प, चित्रकला आणि पुस्तक खरेदी करणं उत्तम मानले जाते.
 
3 पिंपळाच्या झाडाला पुष्य नक्षत्राचे प्रतीक मानले आहे या नक्षत्रात जन्म घेणारे लोक आपल्या घराच्या रिकाम्या जागी पिंपळाचं झाडं लावून त्याची पूजा करतात. ज्यामुळे त्यांच्या जीवनात नेहमी सुख, आनंद शांती आणि समृद्धी राहते.
 
4 या दिवशी पूजा किंवा उपवास केल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होते. सर्वप्रथम आपल्या घरात सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी देवी आई लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावावा आणि एखाद्या कोणत्या नव्या मंत्राचा जप सुरू करा.
 
5 या दिवशी डाळ, खिचडी, तांदूळ, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, कढी, बुंदीचे लाडू इत्यादींचे सेवन करतात आणि आपल्या इच्छेनुसार दान करतात. 
 
6 या दिवशी बही खात्यांची पूजा करणे आणि लिहिण्या सारखे काम सुरू करू शकता. या दिवसापासून नवे काम करणे जसे की दुकान खोलणे, व्यवसाय करणे किंवा इतर कोणते ही काम, काही नवीन शिकायचे असल्यास, लेखक आहात तर काही नवीन लिहायचे असल्यास सुरु करणे शुभ ठरतं.
 
7 या व्यतिरिक्त पुष्य नक्षत्रात दैवीय औषधी आणून त्यांना सिध्द करतात. या दिवशी कुंडलीत असलेल्या दूषित सूर्याच्या दुष्परिणाम कमी करता येतं.
 
8 या दिवशी पैशांची गुंतवणूक दीर्घ काळासाठी केल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम मिळतात.
 
9 या शुभ दिनी महालक्ष्मीची पूजा केल्याने पिंपळ किंवा शमीच्या झाडाची पूजा केल्यानं विशेष आणि इच्छित फळ प्राप्त होतात.
 
10 गुरु पुष्य किंवा शनी पुष्य योगाच्या वेळी लहान मुलांची मुंज आणि त्यानंतर त्यांना प्रथमच विद्याभ्यासासाठी गुरुकुलात पाठवणी केली जाते.