1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (22:50 IST)

शनि राशी बदल 2021: शनीच्या साडेसातीचा या 3 राशींवर परिणाम होईल, तुमची देखील राशी आहे का?

Shani rashi parivatan 2021-The effect of shani sade sati will be on these 3 zodiac signs
वैदिक ज्योतिषात शनी ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. शनीची राशी बदल सुमारे अडीच वर्षात होते. सध्या मकर राशीमध्ये शनी गोचर करत आहे. शनीच्या साडेसातीचा परिणाम धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर होतो. मकर आणि तूळ राशी शनि ढैय्याच्या कचाट्यात आहे.
 
ज्योतिषांच्या मते, शनीचे साडे सती आणि ढैय्या दोन्ही त्रासदायक मानले जातात. या काळात जातकांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते पण हे जरूरी नाही की शनीची दशा प्रत्येक व्यक्तीसाठी अशुभ असते.  ज्यांच्या कुंडलीत शनीची स्थिती मजबूत आहे, त्यांना शनीच्या दशामध्ये शुभ फळ मिळते. जाणून घ्या शनीची राशी कधी बदलेल आणि कोणत्या राशीला शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल-
 
कुंभ राशीत शनीचे गोचर -
29 एप्रिल 2022 रोजी शनी मकर सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. 12 जुलैपर्यंत शनी या राशीमध्ये राहील. शनी कुंभ राशीत प्रवेश करताच धनु राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका होईल, तर मीन राशीला साडे सतीचा फटका बसेल. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती राहील. 12 जुलै, 2022 रोजी शनी मकर राशीत गोचर करेल. शनीचे मकर राशीत आल्याने  धनू राशीवर परत साडेसाती सुरू होईल आणि मीन राशीचे लोक शनी दशापासून मुक्त होतील.
 
शनीची वक्री अवस्था  
12 जुलै 2022 ते 17 जानेवारी 2023 पर्यंत, शनी मकर राशीमध्ये प्रतिगामी स्थितीत गोचर केल्यानंतर पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर धनू राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून पूर्ण मुक्ती मिळेल. शनीच्या गोचरमुळे मीन राशीचे लोक साडे सतीच्या पकडीत राहतील. त्याच वेळी, शनि ढैय्या कर्क आणि वृश्चिक राशींवर सुरू होईल.
 
या 5 राशींना दिलासा मिळेल-
सध्या मकर, तुला, कुंभ, धनू आणि मिथुन राशीचे लोक शनीच्या साडेसाती आणि शनि ढैय्याच्या प्रभावाखाली आहेत. 11 ऑक्टोबर 2021 पासून शनी मार्गी होणार आहे. या काळात या लोकांना थोडा आराम मिळू शकतो.