गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. गुरूमंत्र
Written By
Last Modified: रविवार, 4 एप्रिल 2021 (09:55 IST)

अभ्यास करण्यासाठी काही टिप्स

प्रत्येक विद्यार्थीची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. परंतु सर्वांचे ध्येय समानच असतात. अभ्यास करून यशस्वी व्हायचे. या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण अभ्यास चांगले करून यशस्वी बनाल.चला तर मग जाणून घेउ या.
 
* मेंदूला स्थिर करा- आपण अनुभवले असणार की आपण अभ्यासाला बसतांना आपल्या मेंदूत अनेक विचार गोंधळ करत असतात. या मुळे आपल्याला अभ्यासासाठी एकाग्रता मिळत नाही. या साठी आपण मेंदूला स्थिर करण्याचा प्रयत्न करा.आपले लक्ष पुस्तकावर केंद्रित करा. सुरुवातीस असे करायला त्रास होईल नंतर सवय होईल. 
 
*अभ्यासाला बसण्यापूर्वी स्वतःला ताजेतवाने करा.
* सोपे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.
* अभ्यासाच्या दरम्यान शिक्षकांची शिकवण लक्षात ठेवा.
* अभ्यासाचे लक्ष निर्धारित करा.
* अभ्यास नेहमी वेळापत्रक बनवून करावे. 
 
2 अभ्यासाची जागा वेळच्यावेळी बदलत राहा-अभ्यासाची जागा अशी असावी जेथे शांतता असेल. अशा शांत ठिकाणी अभ्यास केल्याने अभ्यासात एकाग्रता टिकून राहील. या साठी हे करावे. 
*  एकांतात अभ्यासाला बसावे. 
* शांत वातावरण शरीराला ऊर्जावान बनवतो. या मुळे अभ्यासात एकाग्रता वाढते.
 
3 सकारात्मक विचार ठेवा- नेहमी सकारात्मक विचार ठेवा. यासाठी आपण काही सकारात्मक प्रेरक विचार देखील वाचू शकतात. सकारात्मक विचार ठेवल्याने आत्मविश्वास वाढतो .
* प्रेरक विचार वाचावे. 
* विद्वानांचे प्रेरक विचार लक्षात ठेवा आणि त्याचे अवलंब करा. 
 
4 वेळेचे बंधन पाळा- जे वेळेनुसार काम करतो वेळेचे बंधन पाळतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. असे म्हणतात. वेळेची किंमत समजून त्यानुसार आपले वेळा पत्रक बनवा आणि अभ्यास करा. वेळेचे महत्त्व समजा. असं म्हणतात की गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून वेळच्या वेळीच काम करावे. 
* अभ्यासासाठी किमान सलग 3 तास द्यावे. 
*  सकाळी लवकर उठून अभ्यास करावा. 
 
5 शिस्त बाळगा- नेहमी शिस्त बाळगावी कारण एक चांगल्या विद्यार्थी ची ओळख त्याच्या शिस्तीमुळेच असते. शिस्तीत राह्ल्याने हे समजेल की कोणते कार्य कधी करावयाचे आहे आणि कोणते करावयाचे नाही. 
* प्रत्येक काम वेळीच आणि पूर्ण करा. 
* कोणतेही काम उद्यावर टाळू नका. 
* वेळेचे बंधन पाळा.
* वेळीच अभ्यास पूर्ण करा. 
या सर्व  टिप्स अवलंबवल्याने आपल्याला अभ्यास करणे सोपे जाईल आणि आपण नक्कीच परीक्षेत उत्तम गुण आणून यश संपादन करू शकाल.