शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (14:48 IST)

बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास, हे आयुर्वेदिक उपाय अवलंबवा

बद्धकोष्ठता जरी छोटासा शब्द आहे तरी ज्यांना हा त्रास असे त्यांनाच माहित असत की हे आपल्या आयुष्याला कशा प्रकारे व्यथित करतो. पोट स्वच्छ न झाल्यामुळे शारीरिक त्रासांसह त्वचेच्या देखील समस्या होतात. स्वतः कडे लक्ष देण्यासाठी आपल्या सवयींमध्ये सुधारणा केली पाहिजे. काही अशा सवयी असतात ज्यांच्या मुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. या आजाराबद्दल बोलावं तर सामान्य बद्धकोष्ठतेपासून ते गंभीर बद्धकोष्ठता या मध्ये समाविष्ट आहे. जसं  कधीकधी होणारी बद्धकोष्ठता, क्रॉनिक बद्धकोष्ठता(तीव्र प्रमाणे झालेली बद्धकोष्ठता) प्रवासामुळे आणि वयामुळे झालेली बद्धकोष्ठता. या आजारामध्ये आपले आतडे विष्ठा सोडत नाही. 
 
* लिंबू पाणी -
लिंबू आपल्या शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतो. बद्धकोष्ठता झाली आहे तर एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबाचा रस आणि मध मिसळा आणि पिऊन घ्या.
 
* दूध आणि दही -
बद्धकोष्ठतेचा त्रासाला दूर करण्यासाठी पोटात चांगले बॅक्टेरिया होणं देखील आवश्यक आहे. साध्या दही सह प्रोबायोटिक्स मिळेल,म्हणून आपण दिवसातून एक ते दोन कप दही जरूर खावं. या शिवाय जर आपण खूप अस्वस्थ आहात तर एक ग्लास दुधात एक ते दोन चमचे तूप मिसळून रात्री प्यायल्यानं फायदा मिळेल. 
 
* आयुर्वेदिक औषध- 
झोपण्याच्या पूर्वी दोन ते तीन त्रिफळा गोळी गरम पाण्यासह घ्या. त्रिफळा हरड,बेहेडा आणि आवळा ने बनलेला असतो .त्रिफळा रात्रीच आपले काम सुरू करतो.
 
* अन्नामध्ये फायबर -
एक दिवसात एका स्त्रीला सरासरी 25 ग्रॅम फायबरची गरज असते.तर पुरुषाला 30 ते 35 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. आपल्या पचन प्रणालीला सुरळीत करण्यासाठी आणि पुन्हा रुळावर आणण्यासाठी खात्री करा की आपण दररोजच्या गरजेनुसार किती फायबर घेत आहात.