वाढत असलेली पोटाची अतिरिक्त चर्बी होईल दूर, दोन वेळेस सेवन करा हे पेय, जाणून घ्या फायदे
पोटाला आलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी देखील हे पेय खूप फायदेशीर ठरते. पण तुम्ही एक सोप्पा आणि घरघुती उपाय शोधात असाल तर हे पेय नक्की ट्राय करा.
घरगुती उपाय-
लिंबू - 1
आल्याचा तुकडा - 1 इंच
मध- 1 चमचा
पुदिन्याची पाने- 5-6
गरम पाणी - 1 ग्लास
1. अर्धा लिंबू घेऊन त्याचा रस काढावा.
2. आल्याचा तुकडा किसून त्यामध्ये घालावा.
3. एक ग्लास गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस, किसलेले आले, मध घालावे.
4. पुदिना पाने हातावर बारीक करून त्या पाण्यामध्ये घालावे.
5. चांगल्या प्रकारे मिक्स करून सकाळी उपाशी पोटी सेवन करावे.
काय आहे याचे फायदे-
1. लिंबू: लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. हे मेटाबॉलिज्म वाढवते, ज्यामुळे कॅलरी बर्न होतात.
2. आले: आल्यामध्ये असलेले तत्व पोटावरील चर्बी कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच पाचनतंत्र सुरळीत राहण्यास मदत करते.
3. मध: मधामध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीराला ऊर्जा प्रदान करते आणि मेटाबॉलिज्मला जलद करते.
4. पुदीना: पुदिन्याने पाचनतंत्र सुरळीत राहते आणि पोटाच्या समस्येपासून अराम मिळतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik