शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (16:58 IST)

उन्हाळ्यात त्वचा थंड ठेवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

रणरणत्या उन्हात त्वचेची काळजी घेणं तितकं सोपं नसत. या हंगामात त्वचा काळपटते,जळते,असे काही घरगुती उपाय सांगत आहोत जे उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेतील. 
 
1 जायफळ उघाळून काळपट त्वचेवर लावा.
 
2 हळद,हरभराडाळीचे पीठ आणि मुलतानी माती सम प्रमाणात मिसळून त्यात पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट काळपट त्वचेवर लावा.अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवून घ्या.  
 
3 कोरफड गायीच्या दुधात मिसळून लावा अर्धा तासानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. त्याच प्रमाणे आपण चंदनाची पेस्ट देखील लावू शकता. 
 
4 गरिष्ठ,तेलकट,मसालेदार, अन्न खाणं टाळा. असं केल्याने आपण सुंदर आणि चकचकीत त्वचा मिळवू शकता. 
 
5 पाणी भरपूर प्या आणि इतर द्रव्य पदार्थांचे सेवन करा. या मुळे रक्त स्वच्छ होत आणि शरीरातील विषारी घटक बाहेर निघतात. त्वचा आतून स्वच्छ होईल.
 
6 काकडी किसून चेहऱ्यावर लावून मॉलिश करा. असं केल्याने त्वचा स्वच्छ होऊन उजळेल.
 
7 सकाळी अनोश्यापोटी एक ताजा मुळा आणि त्याची कोवळी पाने चावा. थोडा मुळा किसून चेहऱ्यावर लावा असं किमान एक महिन्या पर्यंत करा.
 
8 आलं किसून चेहऱ्यावर लावा आणि एक-दोन तास तसेच राहू द्या. अंघोळीच्या वेळी हळुवार हाताने काढा नंतर नारळाचं तेल लावा. असं काही दिवस केल्याने त्वचेवरील काळपटपणा दूर होईल.
 
9 कांद्याचे बियाणे वाटून मधात मिसळून लावा आणि हळू-हळू चोळा .2 -3 दिवस हे करा या मुळे चेहऱ्यावर चकाकी येते. 
 
10  पंधरा ग्राम हळद वड किंवा पिंपळाच्या दुधात मिसळून मळून घ्या रात्री झोपताना हे चेहऱ्यावर लावा नंतर सकाळी चेहरा धुवून घ्या असं केल्याने काळपटपणा कमी होईल. 
उन्हाळ्यात थंड त्वचा मिळवण्यासाठी हे सांगितलेले उपाय अवलंबवा.