गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (21:53 IST)

Home Remedies: तोंडाचे छाले पासून हे घरगुती उपाय आराम देतात

Home Remedies: These home remedies provide relief from mouth sores Home Remedies: तोंडाचे छाले पासून हे घरगुती उपाय आराम देतातMarathi Home Remedies Arogya Marathi Lifestyle Marathi In Webdunia Marathi
तोंडात छाले होण्याची समस्या खूप वेदनादायक आणि अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे अन्न गिळायला त्रास होतो. तोंडात छाले अनेक कारणांमुळे होतात. पोट खराब होणे हे मुख्य कारण मानले जाते. तोंडात वारंवार छाले होणे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे लक्षण देखील असू शकते. याशिवाय, व्हायरल इन्फेक्शन मुळे देखील हे होऊ शकते. काही औषधें आणि मल्हम हे वेदना कमी करू शकतात.पण ते क्षणिक असतात. वारंवार तोंडात छाले होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे एखाद्या आजाराचे लक्षण देखील असू शकते. तोंडातील छाले कमी करण्यासाठी आणि बरे करण्यासाठी काही घरगुती उपाय केल्याने आराम मिळतो. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1 मध -तोंडातील छाल्यांपासून आराम मिळण्यासाठी मध लावणे फायदेशीर ठरते. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो, जो जखमा भरून काढण्यासाठी आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. कापसाच्या मदतीने फोडांवर मध लावा, हे दिवसातून दोन ते तीन वेळा करा. मधामध्ये असलेले औषधी गुणधर्म जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
 
2 हळद -हळद ही अँटीसेप्टिक आहे, ती जवळजवळ सर्व भारतीय पाककृतींमध्ये वापरली जाते. जंतुसंसर्गाशी लढा देण्याबरोबरच, तोंडाच्या छाल्यांमुळे होणारी जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी हळद देखील उपयुक्त आहे. हळदीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात, जे छाले बरे करतात. हळदीची पेस्ट लावल्याने किंवा हळदीच्या पाण्याने गुळणे केल्याने फायदा होतो. 
 
3 कोरफड -कोरफड हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. तोंडाचे छाले बरे करण्यातही त्याचे फायदे दिसून आले आहेत. नैसर्गिकरित्या काढलेला कोरफडीचा रस घ्या आणि छाल्यावर लावा. कोरफडचे अँटिसेप्टिक गुणधर्म आपल्याला छाल्यांपासून  त्वरित आराम देण्यास मदत करतील. कोरफड  छाल्याच्या जखमा भरून काढण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
 
4 तुरटीचे पाणी-तुरटी ही जखमा भरण्यासाठी अतिशय प्रभावी घरगुती उपाय मानली जाते. तोंडाचे छाले बरे करण्यासाठी तुरटी उपयुक्त ठरू शकते. कोमट पाण्यात तुरटी हलकी मिसळून गुळणे करा. असे दिवसातून दोन ते तीन वेळा केल्याने छाल्याची जखम आणि वेदना दोन्ही कमी होतात.