मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (12:22 IST)

या 7 स्वयंपाकघरातील वास्तू ज्या फुफ्फुसांना निरोगी ठेवणार, जाणून घेऊ या काय आहे त्या ..

आपल्या स्वयंपाकघरातील उपस्थित असलेल्या या 7 वस्तूंमध्ये दडलेले आहेत फुफ्फुसांना निरोगी असल्याचे पोषक तत्त्व, सेवन जरूर करावं..
 
आपल्या स्वयंपाकघरातील असलेल्या या 7 वस्तूंमध्ये दडलेले आहे फुफ्फुसांना निरोगी ठेवणारे पोषक घटक, आवर्जून सेवन करावं या कोरोनाच्या काळात फुफ्फुसांशी निगडित कोणतेही त्रास धोकादायक असू शकतात. अश्या परिस्थितीत ते निरोगी राहण्यासाठी काही गोष्टींना आपल्या आहाराचा भाग बनवा.
 
आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणाऱ्या भाज्या, मसाले, आणि फळांमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, जे फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर असतात आणि कोरोना काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवणे. जरी या साठी व्यायाम आणि योगासने सर्वात प्रभावी उपाय सांगितलेले असले तरी खाण्या-पिण्याचे देखील महत्त्वाची भूमिका आहे. चला तर मग जाणून घेऊ या काही अश्या पोषक घटकां बद्दल. 
 
1 कॅरोटिनायड : हा असा एकअँटीऑक्सीडेंट घटक आहे, जे व्यक्तीला दम्या आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या जोखिमीपासून वाचवतं. फुफ्फुसातील असलेल्या विषारी द्रव्याला बाहेर काढण्याचे काम करतं. नियमाने गाजर, ब्रोकोली, बीट, टोमॅटो आणि पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने या घटकाची कमतरता पूर्ण होते.
 
2 ओमेगा-3 फॅटी ऍसिड : हे केवळ मेंदूसाठीच नव्हे तर फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. या साठी आपल्या आहारात सुके मेवे आणि अलसीचा प्रामुख्याने समावेश करावं.
 
3 फॉलेटजन्य पदार्थ : आपले शरीर अन्नामधील मिळणाऱ्या पोषक घटक फॉलेटला फॉलिक ऍसिडमध्ये रूपांतरित करतं, जी रोग प्रतिकारक शक्तीला बळकट करून फुफ्फुसांचे संरक्षण करतं. मसुराची डाळ आणि हिरव्या पालेभाज्या फॉलेटने समृद्ध असतात, म्हणून या गोष्टींचे नियमाने सेवन करावं.
 
4 व्हिटॅमिन सी : व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले आंबट फळांमध्ये पुरेश्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट घटके असतात, जे श्वास घेताना शरीराच्या इतर भागात ऑक्सिजनची पोहोचवण्यात मदत करते. या साठी संत्री, लिंबू, टोमॅटो, किवी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे आणि अननस सारख्या फळांना आपल्या आहारात प्रामुख्याने समाविष्ट करावं.
 
5 एल्सीन : लसणात असलेले एल्सीन नावाचे घटक फुफ्फुसांच्या सुजेला कमी करतात आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.
 
6 फ्लेवोनॉयड : हे अँटी ऑक्सीडेन्ट घटक फुफ्फुसातील कॉर्सिनोजेन नावाच्या हानिकारक घटकांना काढतं. सफरचंद आणि डाळिंब हे त्याचे सर्वोत्तम स्रोत आहेत.
 
7 करक्युमिन : हळदीमध्ये असलेले करक्युमिन नावाचे घटक फुफ्फुसांना बळकट करतं आणि दम्याच्या रुग्णांना देखील आराम देतो.