शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

कॅन्सरवर पुदिना, तुळस गुणकारी!

भारतात तुळसीचे रोप अनेक शतकांपासून विशिष्ट स्थान मिळवून आहे. पुदीनादेखील भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. राजस्थान विद्यापीठातील 10 विद्यार्थ्यांनी तुळस आणि पुदीना यांच्यातील कॅन्सरविरोधी गुणांवर संशोधन केले आहे. संशोधन करणार्‍या संघाने उंदरांवर 6 महिने संशोधन केल्यानंतर ते या निष्कर्षावर पोहोचले की, तुळस आणि पुदिनामध्ये कॅन्सरविरोधी भरपूर गुण आहेत. या संशोधनामुळे अनपेक्षित निष्कर्ष निघाला आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगाचा या दोन्ही ‍वनस्तीचा सकारात्मक परिणाम दिसला.

उंदरांना दोन गटात विभागले. त्यानंतर एका गयावर रासायनिक लेप लावण्यात आला, दुसर्‍या गटावर तुळस आणि पुदीनाचा लेप लावला. एका महिन्यानंतर पाहिले की, ज्या उंदरांवर तुळस आणि पुदीन्याचा लेप लावला नव्हता, त्यांच्या शरीरावरील अनेक जखमा कायम होत्या. या उलट ज्या उंदरांवर पुदीना आणि तुळसीचा लेप लावला होता. त्यांच्यवर 11 महिन्यानंतर अशा जखमा झाल्या. उघड आहे की, दुसर्‍या गटातील उंदरांची प्रतिकारकशक्ती वाढली. 

संशोधन संघाने सर्वप्रथम त्वचा कॅन्सरवर पुदीना आणि तुळशीच्या परिणामाचे अध्ययन केले. त्यानंतर उंदणांच्या फुफ्फुस आणि आतडीवर या दोन्ही वनस्पतींच्या परिणामाचे अध्ययन केले. ते या निष्कर्षावर आले की, ज्या उंदरांना पुदीना आणि तुळशीचा लेप नियमितपणे लावण्यात आला. त्यांची कॅन्सरविसरोधी प्रतिकारशक्ती वाढली. कॅन्सर तेव्हा होतो, जेव्हा शरीरात आढळणार्‍या फ्री रेडिकल एखाद्या पेशीची आनुवांशिक बनावट असंतुलित करते. यामुळे पेशी विभाजनाची प्रक्रिया खूप वेगाने होते. पुदीना आणि तुळशीत अनेक प्रकाराचे पाचक घटकही आहेत. ते फ्री रेडिकल नष्ट करू शकतात. बाभूळ आणि गोखरूच्या झाडातही कॅन्सरविरोधी घटक आढळले आहेत.