गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जुलै 2015 (14:30 IST)

तोंड आलंय मग हे घरगुती उपाय करून बघा ..

बर्‍याच वेळा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने काही जणांना तोंडही येते. तोंड आल्यावर काही पदार्थ खाल्ल्याने तिखटच लागतात. तोंडाची चव जाते. अशा वेळी जेवणही जात नाही. तोंड आल्यावर हे घरगुती उपाय करून बघा फरक पडेल.
* सर्वप्रथम छाले झाले असल्यास जिभेवर ताबा ठेवा. मसालेदार जेवण आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. पालेभाज्या आणि व्हिटॅमिन बी आणि सी युक्त पदार्थाचे सेवन करा. 
* तोंडातील छाले बरे करण्यासाठी कोथिंबीर वाटून तिचा रस काढून लावा. 
* धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. याने गुळण्या केल्याने छाले बरे होतात.
* वेलचीचे चूर्ण मधात मिसळून लावा आणि लाळ गळू द्या. 
* जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात.
* पेरूच्या झाडाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा आणि जीभ स्वच्छ होते आणि छाले बरे होतात. 
* हळद पाण्यात घोळून ठेवावी. या पाण्याला गाळून याने गुळण्या कराव्या. 
* मधाला पाण्यात मिसळून गुळण्या कराव्यात.