गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

योग्य आहारातून जगा सुंदर आयुष्य..

सुंदर दिसणे कुणाला आवडत नाही. मेक-अप करुन बाह्यसौंदर्य वाढविण्याचे प्रयत्न प्रत्येकजणच करीत असतो पण, अनैसर्गिक साधनांच्या वापरामुळे आपल्या नैसर्गिक सौदर्यावर दुष्परिणामही दिसून येऊ शकतो म्हणूनच बाहेरचे सौंदर्य जपण्यासाठी जसे प्रयत्न होतात तसेच नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी शरीरासाठी योग्य आहाराची गरज असते. अगदी खाण्यापिण्याची काळजी घेण्याबरोबरच छोट्या-छोट्या प्रयत्नातून तुमचे बाह्य आणि अंर्तसौंदर्य खुलू शकतेच शिवाय तुम्ही आजारापासून दूर राहता. ते कसे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना!  तर हे नक्की वाचा...
 
१ जेवणात रोज हळदीचा वापर हा शरीरातली विषाक्तता घालवते. हळदीच्या सेवनानं त्वचेचं सौंदर्य खुलतं. म्हणूनच दुधात चिमूटभर हळद टाकून कपभर दूध रोज प्यावं. 
 
२ हिंग हा स्वयंपाकात रोज वापरलाच पाहिजे. हिंग करपट ढेकरामुळे श्वासाला येणारा दरुगध घालवते. हिंग हा जंतावर रामबाण उपाय आहे. हिंगाच्या सेवनानं त्वचा कुरतडणाºया  जंतूंचा नाश होतो आणि त्वचा फाटत नाही, गुळगुळीत राहते. 
 
३ दाताच्या सौंदयार्साठी खोबरं उपयुक्त ठरतं. थोडं खोबरं रोज चावून खावं. त्यामुळे दात चमकदार होतील. खोबºयाचे चर्वण केल्यानं जबड्याचाही व्यायाम होतो. 
४ दुधापासून बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे आत्मविश्वास वाढतो. शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि त्वचाही मऊ व्हायला मदत होते.
 
५ विड्याचे पान जेवणानंतर अवश्य खावं. पानामुळे पचनास मदत होते. कान आणि नाकातून गरम हवा बाहेर पडते त्यामुळे रंध्र मोकळी होतात.  हलकं  वाटतं आणि जडपणा निघून जातो. पान सेवनामुळे सायनस मोकळं होतं. बाळंतिणीला कॅल्शियम मिळावं म्हणूनही विडा खायला देतात.
 
५ पाणी भरपूर प्यावे. योग्य प्रमाणात पाणी प्यालं तर सुकलेल्या झाडासारखी झालेली त्वचा टवटवीत होते आणि सौंदर्य खुलतं. नारळपाण्यात त्वचेचे पोषण करणारे घटक असतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा तरी नारळपाणी प्यावं. यामुळे त्वचेला नैसर्गिक तजेला येतो.
६ रोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचं सूप घ्यावं. अशा सूपमधून सर्व प्रकारचे लोहतत्त्व, खनिजं, पोषकतत्त्व शरीराला मिळतात, ज्यामुळे बाह्य सौंदर्य उजळतं. 
 
७ ताजं ताक जेवणात दररोज घ्यावं. ताक-भात थोडा तरी अवश्य आहारात घ्यावा. यामुळे तृष्णा शांत होते. ताकामुळे चेहºयावर चमक येते आणि ताजंतवानं वाटतं.