शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 26 एप्रिल 2020 (10:31 IST)

हृदयातून गालावर आणि गालावरून स्मितेत जे तरंगते ते प्रेम... अक्षय

Happy Akshay Tritiya to all of you
कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर..... अक्षय

अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी... अक्षय

वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य.... अक्षय

एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास... अक्षय

सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता... अक्षय

स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया.... अक्षय 
 
हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम... अक्षय 
 
इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री... अक्षय 
 
स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव.... अक्षय 
 
मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण..... अक्षय
अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा